जागतिक आरोग्य दिनानिमित्त अनिल मकरीये यांची संतोषी मातानगर आरोग्य केंद्राला भेट; दर्जेदार आरोग्य सेवांवर भर. ही
मनपा:-
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे मा. स्थायी समिती सभापती श्री अनिल मकरीये यांनी आज दिनांक 07 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने संतोषी मातानगर येथील आरोग्य केंद्राला भेट देऊन तेथील विविध सुविधांची पाहणी केली.
या पाहणीदरम्यान रुग्णांना दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय सेवा, स्वच्छता व्यवस्था तसेच उपलब्ध उपचार सुविधांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्य सेवा मिळाव्यात, यासाठी आवश्यक त्या बाबींवर चर्चा करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.
निरोगी समाज घडवण्यासाठी आरोग्य सेवांची गुणवत्ता अधिक सक्षम करण्यावर प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. तसेच या कामांसाठी आवश्यक निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.





