आता तरी वचन पाळा’ – कॉकरोच जनता पार्टीचे भ्रष्टाचारविरोधी पहिल्या आश्वासनावर लक्ष.
CJP म्हणते: भ्रष्टाचाराविरुद्ध पहिले वचन पूर्ण करण्याची वेळ.
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या “तरुण बेरोजगार कॉकरोचसारखे” या वक्तव्यावरून सुरू झालेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ने आता भ्रष्टाचाराविरोधातील आपले पहिले वचन पूर्ण करण्याची वेळ आल्याचे म्हटले आहे. 30 वर्षीय अभिजीत दिपके यांनी बोस्टन युनिव्हर्सिटीतून ही व्यंगात्मक राजकीय चळवळ सुरू केली.
CJP चा भ्रष्टाचारविरोधी अजेंडा काय?
पक्षाच्या जाहीरनाम्यात व्यंग्याच्या आड दडलेले गंभीर राजकीय मुद्दे आहेत. भ्रष्टाचाराशी संबंधित प्रमुख मागण्या:
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य: निवृत्तीनंतर सरन्यायाधीशांना राज्यसभेवर पाठवण्यास पूर्ण बंदी
पारदर्शकता: RTI अंतर्गत पूर्ण पारदर्शकता आणि राजकीय देणग्यांमध्ये गुप्तता नको
पक्षांतरबंदी: पक्ष बदलणाऱ्या राजकारण्यांवर 20 वर्ष निवडणूक लढवण्यास बंदी.
महिला आरक्षण: मंत्रिमंडळात महिलांसाठी 50% आरक्षण .
पक्ष म्हणतो: “Five demands. Zero sponsors. One large, stubborn swarm”.
सदस्यत्वाचे निकष – व्यंग्यातून व्यवस्थेवर टीका
CJP मध्ये सामील होण्यासाठी निकष:
बेरोजगार: मजबुरीने, इच्छेने, किंवा तत्त्वाने
दीर्घकाळ ऑनलाइन: दिवसाला किमान 11 तास
व्यावसायिकदृष्ट्या तक्रार करणारे: ऑनलाइन रँटिंगमध्ये तरबेज
व्यवस्थेमुळे भावनिकदृष्ट्या थकलेले.
3 दिवसात 1 लाख सदस्य – सोशल मीडियावर धुमाकूळ.
नोंदणी फॉर्म काही तासांत 15,000 पार, 19 मे पर्यंत 80,000, नंतर 1 लाखाचा दावा
Instagram: 18 लाख फॉलोअर्स, X: 59,000 फॉलोअर्स
-TMC च्या महुआ मोईत्रा, कीर्ती आझाद यांचा पाठिंबा.
CJP चे स्पष्टीकरण
“वाढत्या पाठिंब्यामुळे आम्हाला असामाजिक ठरवण्याचा प्रयत्न होईल. पण CJP भारतीय संविधानावर विश्वास ठेवते आणि त्याच्या मूल्यांचे रक्षण करेल”
पार्श्वभूमी: CJI सूर्यकांत यांनी “काही तरुण कॉकरोचसारखे, बेरोजगार आणि व्यवसायात जागा नाही” असे म्हटले होते. नंतर त्यांनी स्पष्टीकरण दिले की ते बोगस डिग्रीवाल्यांबद्दल बोलत होते, युवकांबद्दल नाही 4145
पुढे काय?CJP ने 2029 साठी ‘Five-Point Agenda’ जाहीर केला असून सर्व विरोधी पक्षांना पाठिंब्याचे आवाहन केले आहे “BJP वगळता” .
CJP चा निवडणूक चिन्ह: कॉकरोच असलेला स्मार्टफोन मेम कल्चर आणि राजकीय व्यंग्याचा संगम





