ऑल इंडिया बोर्ड मुतवली विंग तर्फे टॉम ऑफ मलिक अंबर दर्गाचे सुशोभीकरण करण्यासाठी महानगर पालिका प्रशासनास निवेदन
आज सोमवार दिनांक 10 ऑगस्ट 2026 ऑल इंडिया उलमा बोर्ड मुतवल्ली विंग तर्फे औरंगाबाद येथील महानगरपालिकेचे महापौर समीर राजूरकर आयुक्त अमोल येडगे यांना निवेदन देण्यात आले आणि विरोधी पक्षनेता अब्दुल समीर साजिद तसेच सभापती अनिल मकरये या दोघांचा सत्कार करून सन्मानित करण्यात आले तसेच औरंगाबाद शहरातील पर्यटन स्थळांची जी दुरावस्था झालेली आहे त्या ऐतिहासिक स्थळांचे सुशोभीकरण करण्याचे जे निर्णय मनपा प्रशासनाने घेतलेले आहे या निर्णयाबद्दल त्यांचे शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून सन्मानित करण्यात आले औरंगाबाद शहरातील विकासासाठी अमूल्य पाऊल उचलल्या बद्दल उलमा बोर्ड मुतवली विंग तर्फे महानगर प्रशासनाचे आभार व्यक्त करण्यात आले.
शासकीय महाविद्यालय रुग्णालय परिसरातील ऐतिहासिक टॉम ऑफ मलिक अंबर दर्गाचे दुरुस्ती करून मजारीचे तसेच परिसरातील तीन गुंठे जागेवर मुसाफिर खाना बांधून देण्यात यावा जेणेकरून घाटी रुग्णालयातील मराठवाड्याहून येणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना राहण्याची व्यवस्था होऊ शकेल अशी व्यवस्था करण्यात करण्यात यावी.
मालिका अंबर यांचे औरंगाबाद शहरासाठी मोठे योगदान असून त्यांनी शहरात मलिक अंबर नहरी ची सुरुवात करून मागील चारशे वर्षांपासून पेजलाची व्यवस्था केलेली आहे ती आजपर्यंत आपल्या औरंगाबाद शहरांमध्ये पूर्वरत चालू आहे आज रोजी शासकीय वैद्यकीय रुग्णालय जुने मेडिकल क्वार्टर क्रमांक बी वन बी टू च्या पाठीमागे मलिक अम्बर यांची ऐतिहासिक मजार असून सध्या ती मोडकळीस आलेली आहे .मलिक अंबर दर्गाचे महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ कार्यालय पानचक्की औरंगाबाद येथे नोंदणी करण्यात आलेली आहे या वक्फ संस्था ज्याचा नोंदणी क्रं एमएसबीडब्ल्यू/एबीडी/279/2011 दि. 30/11/2011 असा आहे त्याच प्रमाणे संस्थेचा वक्फ मालमत्ता महाराष्ट्र शासन वक्फ राजपत्र अनुक्रंमाक 272 वर्ष 3 गुंठे जमिनीची नोंद आहे त्याचप्रमाणे जी-20 च्या वेळेस सदर मलिक अंबर यांची सुशोभीकरण कडे दुर्लक्ष करण्यात आले.सदर दर्गाचे तात्काळ दुरुस्ती न झाल्यास शहरातील ऐतिहासिक वारसा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे म्हणून आपल्या मनपा प्रशासनाद्वारे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सदर दुरुस्ती व बांधकाम करून ऐतिहासिक वारसा जतन करण्यात यावे सदर ऐतिहासिक वारसा जतन केल्यास आपल्या शहराचे नाव हे पर्यटनासाठी प्रसिद्ध होईल तेरी मेहरबान साहेबांनी आपल्या मनपा प्रशासनाद्वारे मलिक अंबर दर्गाचे चारी बाजूने सुशोभीकरण करून सहकार्य करावे यावेळी या निवेदन देऊन मागणी करण्यात आली निवेदन देताना उलमा बोर्ड मुतवली विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष शेख फैसल मुजावर ,महिला जिल्हाध्यक्ष फरजाना शहा, महिला अध्यक्ष नुजत आरा शेख,
महिला शहर सचिव सईदा आपा,
सूफी संत विंग महिला जिल्हाध्यक्ष अनुराधा सोनपसारे ,
शहराध्यक्ष महिला स्मिता येनुरवार, सविता टिळक ,कोमल बनसोडे ,सुमन कीर्तीकर .एडवोकेट जीशान अली ज़ैदी
जिल्हाध्यक्ष मीडिया सेल शाकेर चिस्ती, औरंगाबाद शहर अध्यक्ष उस्मान हबीब खान,
औरंगाबाद शहर उपाध्यक्ष शेख अजीज शेख इसा ,
शहर सचिव सय्यद जाहिद अली. यांच्यासह मोठ्या संख्येने उलमा बोर्ड पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती





