फक्त जनता गुन्हेगार का? प्रशासनाच्या निष्काळजीपणाला दंड नाही - सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल".
छत्रपती संभाजीनगर:रस्त्यावरील वाहतूक नियम मोडल्यास नागरिकांना हजारोंचा दंड, मात्र त्याच रस्त्यावर खड्डे, तुटके सिग्नल, कचरा आणि अंधार असेल तर त्याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.
सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यात नागरिकांवर लादण्यात आलेल्या दंडांची यादी आणि दुसरीकडे प्रशासनाच्या निष्काळजीपणाची यादी एकत्र ठेवून सरकारला जाब विचारण्यात आला आहे.
नागरिकांसाठी दंडाची यादी:
पोस्टनुसार वाहतूक नियम मोडल्यास खालीलप्रमाणे दंड आकारला जातो:
हेल्मेट नाही - दंड 1,000/
नो-पार्किंगमध्ये पार्किंग - दंड 3,000/
विमा नाही- दंड 1,000/
दारू पिऊन वाहन चालवणे - दंड 10,000/
नो-एंट्री झोनमध्ये वाहन- दंड 5,000/
गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे - दंड 2,000/
प्रदूषण प्रमाणपत्र नाही - दंड 1,100/
तीन आसनी सायकल चालवणे - दंड 2,000/
पण प्रशासनासाठी? "कोणीही जबाबदार नाही"
त्याच पोस्टमध्ये दुसरी बाजू मांडताना म्हटले आहे की,
बिघडलेले ट्रॅफिक सिग्नल - कोणीही जबाबदार नाही
रस्त्यावरील खड्डे* - कोणीही जबाबदार नाही
अतिक्रमित फूटपाथ- कोणीही जबाबदार नाही
रस्त्यावर दिवे नाहीत - कोणीही जबाबदार नाही
कचरा, सांडपाणी, भटके प्राणी- कोणीही जबाबदार नाही
खोदून ठेवलेले आणि दुरुस्त न केलेले रस्ते - कोणीही जबाबदार नाही
खड्ड्यात पडून जखमी झाल्यास - कोणीही जबाबदार नाही
नागरिकांचा सवाल:
या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे, "असे वाटते की जनताच एकमेव गुन्हेगार आहे आणि फक्त त्यांनाच दंड भरावा लागेल. प्रशासन, महानगरपालिका आणि सरकारला कोणतेही नियम लागू होत नाहीत. त्यांनाही जबाबदार धरले जाऊ नये का?"
"नागरिकांनी कठोर परिश्रम करावेत, त्रास सहन करावा, कर भरावा, दंड भरावा आणि नंतर त्यांनाच पुन्हा सत्तेत आणावे" अशी खंतही पोस्टमध्ये व्यक्त करण्यात आली आहे.





