२३ मार्च जागतिक हवामान दिवस बदलते हवामान संपूर्ण सृष्टीसाठी चिंताजनक.रमेश कृष्णराव लांजेवार स्वतंत्र पत्रकार
जगातील भयावह घटना पहाता बदलत्या हवामानावर नियंत्रण ठेवणे काळाची गरज.जगात महाप्रलय,भूकंप, सुनामी,वणवे लागणे,ज्वालामुखीचा उद्रेक,अवकाळी पाऊस,अती उष्णता, अती थंडी,ग्लेशियर वितळणे, समुद्राची पातळी वाढने किंवा येणाऱ्या नैसर्गिक आपदा याची सुचना यावर नियंत्रण कसे ठेवता येईल व येणाऱ्या नैसर्गिक आपदांची माहिती कशी मिळु शकेल याउद्देश २३ मार्च १९५० ला जागतिक हवामान संस्थेची स्थापना करण्यात आली.यापुर्वी १९२२ ला हवामान शास्त्रज्ञ लुइस फ्राय रिचर्डसन यांनी हवामानाच्या अंदाजाचा शोध लावुन हवामान पहाण्याकरीता सांख्यिकी पध्दत शोधून त्यानुसार काही प्रमाणात हवामान अंदाज वर्तविता येऊ लागले व हवामानाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचे काम केले. हवामान शास्त्रज्ञ लुइस फ्राय रिचर्डसन यांनी लावलेला शोध आज जगाला अत्यंत कारगर आणि गुणकारी सिध्द झाल्याचे आपण पहातो.त्याच अनुषंगाने १९५० ला जागतिक हवामान संस्थेची (डब्लुएमओ) स्थापना करण्यात आली या संस्थेचे मुख्यालय स्वित्झर्लंड येथील जिनेव्हा येथे आहे.यानंतर (डब्लुएमओ) संयुक्त राष्ट्राची (युएन)विषेश संस्था बनली. पहिला जागतिक हवामान दिवस २३ मार्च १९६१ रोजी साजरा करण्यात आला.त्यावेळी ३१ सदस्य देश होते आता या आंतरराष्ट्रीय संघटनेचे १९३ देशांपेक्षा जास्त सदस्य आहेत. पर्यावरणातील वाढते बदल याबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या अनुषंगाने या दिवसाला अत्यंत महत्व आहे.गेल्या २० वर्षात युद्धजन्य परिस्थिती, वाढते औद्योगिकीकरण, परमाणु परिक्षण, शहरीकरण मोठ्या प्रमाणात जंगलतोड इत्यादी अनेक कारणांमुळे हवामानातील बदलाने जगातील पर्यावरणाची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे.कारण आज जगातिल पर्यावरण अत्यंत धोकादायक व भयावह स्थितीत येवून ठेपले आहे.यामुळे मानव,पशु-पक्षी व संपूर्ण जीवसृष्टीला मोठा धोका निर्माण झाला आहे.आज जगामध्ये वाढते औद्योगिकीकरण, वायुप्रदूषण, जंगलतोड, युद्धजन्य परिस्थिती,वाढती उष्णता, वाढती लोकसंख्या यामुळे हवामानात रोज वेगवेगळे आमुलाग्र बदल होतांना आपण पहातो.जगात महाप्रलय, सुनामी,भुकंप, ज्वालामुखीचा उद्रेक,अती पाऊस,अती थंडी,अती उष्णता, वणवे लागणे, नैसर्गिक आपत्ती अशा अनेक घटना जगात मानवाच्या अतिरेकामुळे दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे.या येणाऱ्या आपदांची सटीक माहिती हवामान विभाग जगभर देत असते.यामुळे जगातील देश सतर्कता बाळगुन सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पाऊले उचलतात. त्यामुळे आपण समजू शकतो की हवामान खात्याची भुमिका जगासाठी अत्यंत मोलाची आणि महत्त्वाची आहे.आज अत्याधुनिक युगात उपग्रहांच्या (सेटेलाईटच्या) माध्यमातून हवामानातील बदलांचे संकेत हवामान संस्था जगभरातील संपूर्ण देशांना वेळोवेळी देत असते.हवामानातील बदलांचे संकेत लोकांमध्ये जागृता निर्माण करण्याचे काम करीत असते.हवामान दिनाचे औचित्य साधून व हवामानातील वाढते बदल व धोका पहाता निसर्गाला संतुलित ठेवणे गरजेचे आहे.याकरीता जगातील संपूर्ण देशांनी हवामानातील मोठ्या प्रमाणात वाढते बदल पहाता आजच्या दिवसाला जास्तीत जास्त वृक्षारोपण करने अत्यंत गरजेचे आहे.यामुळे वाढत्या हवामानातील बदलांवर नियंत्रण ठेवण्यास मोठी मदत होईल. सोबत निसर्ग प्रफुल्लित राहुन संपूर्ण जंगलातील पशु-पक्ष्यांसाठी एक आल्हाददायक वातावरण निर्माण होईल. कारण हवामानाचे संपूर्ण गणित निसर्गावरच अवलंबून आहे.त्यामुळे निसर्ग सुरक्षित रहाला तर हवामान सुध्दा सुरक्षित राहू शकते.याचा फायदा संपूर्ण जगाला व जीवसृष्टीला होईल.









