धीरेंद्र शास्त्रींची बुद्धी भ्रष्ट झाल्याने;विषेली वक्तव्ये करून करोडो लोकांच्या भावना दुखावल्या :रमेश कृष्णराव लांजेवार.
भारत भुमि ही महाज्ञानी,साधु,संत,थोर महात्मे,तपस्वी, क्रांतिकारक, विचारवंत ,जहालवादी-मवाळवादी यांच्या अथक परिश्रमाने आणि प्रयत्नांना ही भारत भुमि निर्माण झाली आहे. या भुमित देव-दानव,देवीदेवतांनी जन्म घेतला त्यामुळेच जगाच्या पाठीवर भारत असा देश आहे की या भुमित अनेक धर्म,पंथ,जाती,भाषा,वेगवेगळी संस्कृती पहायला मिळतात आणि याला आकार व दिशा देण्याचे काम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या गनिमी काव्याच्या माध्यमातून हिंदवी स्वराज्याची स्थापना करून केले आहे.आजही शिवाजी महाराजांचा इतिहास अजरामर आहे. देशासह जगातील १११ देश शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी करतात आणि शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचा व त्यांच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी विदेशी अभ्यासक महाराष्ट्रात दरवर्षी मोठ्या प्रमाणात येतात.कारण शिवाजी महाराजांसारखी युध्द शैली कोणीही अवगत करू शकले नाही आणि धीरेंद्र शास्त्री म्हणतात की, शिवाजी महाराज युद्ध करून थकले,अरे मुर्ख धीरेंद्र शास्त्री बाबा शिवाजी महाराज कधीच थकले नाहीत त्यामुळेच हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली.आज आपण जगात जे गोरीला युध्द पहातो त्याची सुरुवात याच मातीतून छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आणि जगभरात पसरली.परंतु आज देशात धीरेंद्र शास्त्री सारखे जहरीले विषारी साप सुद्धा दिसून येतात. आपण काय बोलत आहोत याचेही भान स्वयंघोषित बाबा धीरेंद्र शास्त्री यांना नसल्याचे दिसून येते. नागपूरातील एका कार्यक्रमात धीरेंद्र शास्त्रीने वादग्रस्त वक्तव्य शिवाजी महाराजांबद्दल बोलतांना म्हणतात की, शिवाजी महाराज युद्ध करून थकले आणि रामदास स्वामींना म्हणाले,राजपाट सांभाळा.अरे मुर्ख धीरेंद्र बाबा रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरू होते आणि स्वामींचा आशीर्वाद व त्यांच्याशी विचार विमर्श नेहमीच छत्रपती शिवाजी महाराज करायचे आणि मोठ्यांचा आशीर्वाद घेण्याची परंपरा आमच्या महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात हजारो वर्षापासुन आहे.त्यामुळे रामदास स्वामींच्या आदेशाचे पालन शिवाजी महाराज नेहमीच करायचे.कारण रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरू होते. धीरेंद्र शास्त्री बाबा आज जो तुम्ही मोकळा श्वास घेत आहात ना तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुंण्यायीनेच घेत आहात ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे.या पृथ्वीतलावर जर शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर तुम्हीही दिसले नसते.त्यामुळे तुम्ही ज्या ताटात खाता त्याला वारंवार छिद्र पाडने बंद करावे व माफी मागुन पळवाटा काढणे बंद करावे. कारण मिडियामध्ये आपल्याला प्रसिद्धी मिळावी यासाठी आपण वारंवार वादग्रस्त वक्तव्ये करून प्रसिद्धी मिळावीत असतात ही बाब जगजाहीर आहे आणि नंतर माफी मागुन पळ काढतात हेही सर्वांना ग्यात आहे.या अगोदरही धीरेंद्र शास्त्री यांनी अशीच वादग्रस्त वक्तव्ये करून देशाच्या भोळ्याभाबड्या जनतेची दिशाभूल करून भावना दुखावल्या होत्या. एका प्रवचन दरम्यान धीरेद्र शास्त्रींनी सलग दोन दिवस मानवधर्माचे संस्थापक बाबा जुमदेवजी आणि परमात्मा एक सेवक धर्माबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने हजारो सेवक संतप्त झाले होते.धीरेंद्र शास्त्रीने या आधी संत साईबाबा,संत तुकाराम महाराज व भगवान सहस्त्रार्जुन महाराज अशा अनेक संतांबद्दल व देवतांबद्दल आक्षेपार्ह विधान केलेले आहे.ही अत्यंत घृणास्पद आणि निंदनीय बाब आहे याचा सर्वच स्तरातून निषेध सुद्धा करण्यात आला होता.तरीही त्यांचा वादग्रस्त वक्तव्ये करण्याचा गोरख धंदा बंद झालेला नाही. धीरेंद्र शास्त्री स्वतःला महाराज(बाबा) समजतात;परंतु त्यांच्यात तसा कोणताही गुण दिसत नाही. फक्त समाजात फूट पाडून कटुता निर्माण करून जहर पसरविण्याचे काम करतात व स्वत:ला प्रसिद्धी मिळावी या उद्देशाने त्यांचे प्रवचन असते हे त्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून स्पष्ट दिसून येते.देशातील कोणताही व्यक्ती असो प्रत्येक व्यक्ती आपापल्या पद्धतीने देवीदेवतांची व साधुसंतांची पुजा अर्चना करीत असतो आणि मानतो व हा त्यांचा अधिकार आहे.त्यात बागेश्वर बाबा सारखे महाराज जहर घोळण्याचे कार्य करीत असेल तर हिंदू धर्म कदापि सहन करणार नाही. परंतु दुःखची व चिंताजनक बाब म्हणजे धीरेंद्र शास्त्री राज्यात येवून वारंवार वादग्रस्त वक्तव्ये करून माफी मागतात आणि निघून जातात तरी सुद्धा सरकार त्यांना पाठीशी घालत असुन त्यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई करीत नाही ही अत्यंत गंभीर बाब म्हणावी लागेल. कोणताही गुन्हेगार असो तो गुन्हा करतो आणि नंतर माफी मागतोच म्हणून काय धीरेंद्र शास्त्री सारख्या गुन्हेगाराला मोकळे सोडायचे काय? याचाही विचार सरकारने केला पाहिजे. याचप्रकारे गुन्हेगारांनी नेहमीच माफी मागितली तर त्या सर्वांनाच मोकळे सोडणार काय! असे अनेक प्रश्न निर्माण होतात.आजपर्यंत धीरेंद्र शास्त्रीने करोडो लोकांची मने दुखावली त्याचे काय?ही गोष्ट सत्य आहे की शिवाजी महाराजांच्या पुंण्यायीनेच आज बागेश्वर बाबा आपली बाबागीरी करीत आहे अन्यथा कटोरा घेऊन दारोदारी फिरावे लागले असते.आज धीरेंद्र शास्त्री इतिहासाला मलिन करणारे विषेली बाबा झाले आहेत.त्याचप्रमाणे धर्मा-धर्मात फुट पाडण्याच्या उद्देशाने धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणतात की, देशातील नागरिकांनी चार मुले जन्माला घालायला हवीत व त्यातील एक मुलगा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला द्यायला हवा.कारण येणाऱ्या काळात हिंदूंनी आपली लोकसंख्या वाढविली नाही तर येणाऱ्या काळात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात येईल असे सांगत किमान तीन ते चार मुले जन्माला घालण्याचे आव्हान शास्त्री यांनी केले.या गोष्टीला मी मानतो. परंतु याची सुरुवात धीरेंद्र शास्त्रींनी सर्वप्रथम चार मुले जन्माला घालुन करावी नंतर लोकांना ग्यान द्यावे. धीरेंद्र शास्त्री म्हणतात की हिंदूंची संख्या कमी होत आहे याकरीता चार मुले जन्माला घालने आवश्यक आहे.ही बाब धीरेंद्र शास्त्रीची आपण मान्य केली तर त्या मुलांच्या पालनपोषणाचा खर्च कोण करणार याबद्दल बागेश्वर बाबाचे मौन का? आम्ही चार मुले जन्माला घालायला तयार आहोत.त्यातील एक मुलगा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सुध्दा देण्यास तयार आहोत.परंतु मुलांच्या पालनपोषणाचा खर्च, शिक्षणाचा खर्च व त्यांच्या पुढील आयुष्याचा खर्च कोण उचलणार याचाही खुलासा व्हायला पाहिजे.ह्या सर्व गोष्टी "उचल्लि जिभ लावली टाळ्याला" या पद्धतीची आहे.आजही देशात भुकमरी, अतिदुर्गम भागात कुपोषण, महागाई, बेरोजगारीची समस्या,आरोग्याची समस्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्यां,शैक्षणिक समस्या, वृद्धांची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे याकडे लक्ष न देता धीरेंद्र शास्त्री चार मुले जन्माला घालण्याचे आव्हान करतात ही तर बुद्धी भ्रष्ट झाल्याची निशानी दिसून येते.आजच्या परिस्थितीत एका मुलाचे पालनपोषण करणे कठीण आहे आणि धीरेंद्र शास्त्री म्हणतात चार मुले जन्माला घाला हे सर्व मुर्खपणाचे लक्षण आहे.धीरेंद्र शास्त्री याचे नागपूरातील अनेक वादग्रस्त वक्तव्ये लक्षात घेता नागपूरच्या प्रसिद्ध छिंदवाडा रोडवरील दवाखान्यात त्यांनी उपचार घ्यायला पाहिजे.परंतु त्यांनी आतापर्यंत केलेल्या वादग्रस्त वक्तव्ये लक्षात घेता त्यांच्यावर कठोर कारवाई होणेही गरजेचे आहे.कारण त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे करोडो लोकांची मने दुखावली आहेत.





