मतदार जनजागृती संदर्भात जिल्हा स्वीप पथकाने पैठण येथे दिली भेट.

मतदार जनजागृती संदर्भात जिल्हा स्वीप पथकाने पैठण येथे दिली भेट.

जिल्हा स्वीप पथकासमोर आर्य चाणक्य विद्या मंदिर येथील विद्यार्थिनींनी केले पथनाट्य सादर .

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुका 2026 च्या निमित्ताने जिल्हा स्वीप पथकाने पैठण येथे मतदार जनजागृतीच्या संदर्भाने भेट दिली. पैठण तालुक्यात पथकाचे चालू असलेले उपक्रम याचा आढावा घेण्यात आला . पैठण स्वीप पथकातील संतोष पवार किरण गाडेकर यांनी सर्व माहिती संबंधित पथकाला दिली. जिल्हा स्वीप पथकासमोर पैठण येथील आर्य विद्या मंदिर या ठिकाणी मतदार जनजागृतीच्या संदर्भाने विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्यात आला. यावेळी स्वीप नोडल अधिकारी श्री भगवान कांबळे, श्री संजीव सोनार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले  लोकशाही वरील निष्ठा वाढण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी मतदान केले पाहिजे असे आवाहन केले. आपण स्वतः व आपल्या घरातील सर्वांचे शंभर टक्के मतदान करून घेण्याचे आव्हान केले. 

यावेळी आर्य चाणक्य विद्यामंदिर येथील विद्यार्थिनींनी जिल्हा स्वीप पथकासमोर मतदार जनजागृतीच्या संदर्भाने पथनाट्य सादर केले .अतिशय सुंदर पथनाट्य विद्यार्थिनींनी सादर केल्याचे पाहून जिल्हा स्वीप नोडल अधिकारी श्री संजीव सोनार यांनी विद्यार्थ्यांना बक्षीस देखील दिले.

 जिल्हा स्वीप पथकातील नोडल अधिकारी श्री भगवान कांबळे, श्री संजीव सोनार, शशिकांत उबाळे, विनोद राठोड, प्रवीण नरवडे तसेच पैठण येथील स्वीप पथकातील संतोष पवार  किरण गाडेकर हे उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका जोशी मॅडम तसेच सांस्कृतिक विभागाचे श्री भापकर सर व इतर शिक्षकांनी मोलाचे सहकार्य केले.