डोंबिवलीत डॉक्टरवर शिवसेना नेत्याचा हल्ला! महिला डॉक्टर मानसिक धक्क्यात, कर्मचाऱ्यांचे कामबंद.

डोंबिवलीत डॉक्टरवर शिवसेना नेत्याचा हल्ला! महिला डॉक्टर मानसिक धक्क्यात, कर्मचाऱ्यांचे कामबंद.

डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात शिवसेना नेत्याचा धिंगाणा

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातbशिवसेना (शिंदे गट) चे नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी महिला डॉक्टर, इतर डॉक्टर आणि 3 महिला नर्सना मारहाण* केल्याचा गंभीर आरोप आहे. 

घटना 7 जुलै 2026, मंगळवारीbघडली. एका गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. NICU चे सर्व बेड भरले असल्याने डॉक्टरांनी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. त्यावरून वाद झाला. 

"डॉक्टर घाबरल्या आहेत, मानसिकरित्या खचल्या आहेत" - कुटुंबीय

हल्ल्यातील पीडित महिला डॉक्टर डॉ. सृष्टीbयांच्या वडिलांनी सांगितले की त्या "घाबरल्या आहेत आणि मानसिकदृष्ट्या खचल्या आहेत".

"रुग्णांच्या नातेवाईकांनी नगरसेवकाला बोलावले. तो रुग्णालयात आला आणि मारहाण सुरू केली. डॉ. वैभव, नर्स आणि इतरांवर हल्ला केला. डॉ. सृष्टी फोन करत असताना त्याने फोन हिसकावून तिला मारहाण केली. तिला अजूनही भीती वाटते की पुन्हा हल्ला होईल" असे त्यांनी सांगितले. 

 कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन, CCTV फुटेज व्हायरल.

घटनेनंतर डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांनी निषेध म्हणून कामबंद आंदोलन सुरू केले. काही कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाले. "आम्ही रुग्णसेवा करायची की असे हल्ले सहन करायचे?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 

CCTV फुटेजमध्ये म्हात्रे डॉक्टरच्या हातावर मारताना आणि रजिस्टरने डोक्यावर मारताना दिसत आहेत. 

 रमेश म्हात्रे अटक, न्यायालयाने व्हिडिओ हजेरी नाकारली:

पोलिसांनी सुरुवातीला 3 जणांना अटक केली. नंतर रमेश म्हात्रे यांनाही 9 जुलै रोजी अटक करण्यात आली.

अटकेनंतर प्रकृती बिघडल्याने त्यांना ठाणे सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. न्यायालयाने त्यांची व्हिडिओद्वारे हजेरी लावण्याची विनंती फेटाळून शारीरिक हजेरी लावण्याचे आदेश दिले. 

म्हात्रेंवर भारतीय न्याय संहिता कलम 132 आणि 121(1)अंतर्गत गुन्हा दाखल. 

राजकीय प्रतिक्रिया: शिंदे गटाने निषेध, कारवाईचे आश्वासन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हात्रेंना झापले. मंत्री उदय सामंत म्हणाले "महिला डॉक्टरला मारणे चुकीचे आहे".

शिवसेना UBT चे आदित्य ठाकरे यांनी म्हात्रेंना पदावरून हटवण्याची मागणी केली.

खासदार श्रीकांत शिंदे यांनीही हल्ल्याचा निषेध केला. 

 वैद्यकीय संघटनांची मागणी - डॉक्टरांवरील हल्ले थांबवा

IMA महाराष्ट्राने 72 तासांची मुदत देऊन कारवाईची मागणी केली होती. MARD आणि इतर संघटनांनीही निषेध केला.

मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. सादिया पिंजारी यांनी सांगितले की "आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हिंसा खपवून घेतली जाणार नाही".