"पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते मोईन शेख हर्सूलकर यांची शहर काँग्रेसमध्ये सरचिटणीस म्हणून वर्णी"

"पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते मोईन शेख हर्सूलकर यांची शहर काँग्रेसमध्ये सरचिटणीस म्हणून वर्णी"

छत्रपती संभाजीनगर: काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी मोठा निर्णय घेत काँग्रेसचे ज्येष्ठ आणि एकनिष्ठ कार्यकर्ते मोईन शेख हर्सूलकर यांची छत्रपती संभाजीनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदी* नियुक्ती करण्यात आली आहे.

25 वर्षांपासून पक्षसेवा:

गेल्या 25 वर्षांपासून मोईन शेख हर्सूलकर हे काँग्रेस पक्षाशी निगडित आहेत. या काळात त्यांनी सामान्य जनतेची कामे, शहरातील विविध प्रश्न मांडण्याचे काम सातत्याने केले आहे. पक्षाने दिलेल्या प्रत्येक जबाबदारीला त्यांनी तन-मन-धनाने पार पाडले आहे.

शैक्षणिक आणि सामाजिक पार्श्वभूमी:

शिक्षण: MSW - सामाजिक कार्यात पदव्युत्तर पदवी, BJ  पत्रकारितेतील पदवी

पत्रकारिता: साप्ताहिक चौफेर औरंगाबाद नगरी चे मुख्य संपादक म्हणून कार्यरत

अनुभव: काँग्रेस पक्षाच्या काळात दोन वेळा विशेष कार्यकारी अधिकारी म्हणूनही काम पाहिले आहे.

त्यांच्या नियुक्तीमुळे शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

#Congress #ChhatrapatiSambhajinagar #Aurangabad #MoinSheikhHarsulkar #MaharashtraPolitics #Appointment.