"CM फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त शहरभर मोफत स्तन कर्करोग तपासणी मोहीम सुरू".
वृत्त.
छत्रपती संभाजीनगर: मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवी यांच्या वाढदिवसानिमित्त आणि दिवंगत मा. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका व कमलनयन बजाज रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्तन आरोग्य अभियान’ अंतर्गत शहरव्यापी मोफत व सवलतीच्या दरातील डिजिटल मॅमोग्राफी स्क्रीनिंग कार्यक्रमाचा शुभारंभ दि. २२ जुलै २०२६ रोजी कमलनयन बजाज रुग्णालय, बीड बायपास येथे उत्साहात पार पडला.
उद्घाटन:
या अभियानाचे उद्घाटन मा. उपमहापौर श्री. राजेंद्र जंजाळ यांच्या हस्ते झाले. यावेळी मा. आयुक्त श्री. अमोल येडगे., वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समिती सभापती मा. डॉ. श्रीमती सुनिता सोळुंके, अतिरिक्त आयुक्त-2 श्रीमती कल्पिता पिंपळे, नगरसेविका श्रीमती अनिता घोडेले, श्री. नंदकुमार घोडेले, आरोग्य अधिकारी डॉ. उज्वला भामरे, कमलनयन बजाज रुग्णालयाचे CEO डॉ. जॉर्ज नोएल फर्नांडिस, डॉ. अमरज्योती शिंदे, डॉ. प्रेरणा संकलेचा, डॉ. मेघा जोगदंड, डॉ. डिंपल परदेसी यांच्यासह रुग्णालयाचे अधिकारी, कर्मचारी, आशा सेविका आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
महत्त्वाचे मुद्दे:
कार्यक्रमात बोलताना मान्यवरांनी सांगितले की स्तन कर्करोगाचे वेळेत निदान होणे अत्यंत गरजेचे आहे. महिलांनी नियमित आरोग्य तपासणी करून स्वतःच्या आरोग्याबाबत जागरूक राहावे.
यासोबतच १४ ते १५ वर्षे वयोगटातील मुलींसाठी HPV (Human Papillomavirus) लस महानगरपालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रांमध्ये मोफत उपलब्ध आहे. सर्व पालकांनी आपल्या मुलींचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले.
अभियानाविषयी:
राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग प्रतिबंधक व नियंत्रण कार्यक्रम (NP-NCD) अंतर्गत हे अभियान राबवले जात आहे. यामध्ये शहरातील पात्र महिलांसाठी मोफत आणि सवलतीच्या दरात डिजिटल मॅमोग्राफी द्वारे तपासणी केली जाणार आहे.
कोणासाठी मोफत तपासणी:
४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या BPL / आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिला
३० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या BPL महिला* ज्यांच्या कुटुंबात आई, बहीण किंवा मुलीला स्तन कर्करोगाचा इतिहास आहे
EWS महिलांसाठी सवलतीच्या दरात तपासणी
महानगरपालिका आरोग्य विभागाने शहरातील सर्व पात्र महिलांना या अभियानाचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. या उपक्रमामुळे स्तन कर्करोगाचे प्राथमिक अवस्थेत निदान होऊन वेळेत उपचार शक्य होणार आहेत.
#स्तनआरोग्यअभियान #छत्रपतीसंभाजीनगर #मॅमोग्राफी #महिलाआरोग्य #HPV #महानगरपालिका #आरोग्यमोहीम





