वेरूळ लेणी येथे जिल्हा व खुलताबाद जनजागृती कक्षामार्फत मतदान जनजागृती.
वेरूळ (ता. खुलताबाद) — जिल्हा जनजागृती कक्ष व खुलताबाद जनजागृती कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने जगप्रसिद्ध वेरूळ लेणी येथे मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमाचा उद्देश नागरिकांमध्ये लोकशाही प्रक्रियेबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता.
या कार्यक्रमात समदभद्र विद्यामंदिर, वेरूळ येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेले प्रभावी पथनाट्य उपस्थितांचे विशेष आकर्षण ठरले.
पथनाट्यातून विद्यार्थ्यांनी नागरिकांना स्वयंप्रेरणेने मतदान करून देश बळकट करण्याचे आवाहन केले.
विद्यार्थ्यांच्या सशक्त अभिनयामुळे आणि संदेशामुळे उपस्थितांवर सकारात्मक प्रभाव पडला.
या वेळी लेणी पाहण्यासाठी आलेले देश-विदेशातील पर्यटकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनीही या जनजागृती उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा जनजागृती कक्षाचे सहाय्यक अधिकारी प्राध्यापक डॉ भगवान कांबळे, स्वप्निल सरदार,संजीव सोनार, गोविंद बाराबोटे, शशिकांत उबाळे, लक्ष्मीकांत ननावरे तसेच खुलताबाद SVEEP कक्ष प्रमुख सचिन वाघ, मनोहर गावडे, मनोज चौरे, प्रकाश राठोड यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच गुरुदेव सुमंत विद्यामंदिर, वेरूळ येथील मुख्याध्यापक बोराळकर व मिश्रीकोटकर यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.









