टॅलेंटची मोठी झेप: प्रियदर्शनी शाळेच्या दानिश मुजाहेंद शेख या विद्यार्थ्यांची सोशल मीडिया गाजवणारी कामगिरी रिल ला तीन मिलियन व्ह्यूज मनपाचा नवा रॉकस्टार
छत्रपती संभाजीनगर
मनपा प्रियदर्शनी शाळेच्या नव्या 'रॉक स्टार'ने सोशल मीडियावर धूम केली आहे.छत्रपती संभाजीनगर येथील मनपा प्राथमिक शाळा प्रियदर्शनी शाळेच्या एका चिमुकल्या विद्यार्थ्याने - दानिश मुजाहीद शेख याने आपल्या गायनाने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. म्हणतात ना कला वयाची बंधनं पाळत नाही.मा.आयुक्त जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून सर्व शाळांना संगीत शिक्षक व संगीत साहित्य मिळाले.त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संगीताची व गायनाची आवड निमार्ण झाली.यातूनच हा रॉक स्टार तयार झाला.दानिश शेख बालकलाकाराचा हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.सार्थक सोनार आणि संजीव सोनार यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत ३ दशलक्ष (३० लाख) पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले असून नेटीझन्सकडून त्याचे भरभरून कौतुक होत आहे.सोशल मीडियावरील या व्हायरल पोस्टची काही प्रमुख आकडेवारी:लाईक्स: १ लाख ४९ हजार पेक्षा जास्त युजर्सनी याला पसंती दिली आहे.शेअर्स/फॉरवर्ड्स: २३ हजार २०० पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ इतरांना पाठवला आहे.कमेंट्स: जवळपास ९०० हून अधिक लोकांनी कमेंट्सद्वारे या बालकलाकाराला आशीर्वाद दिले आहेत.या लहान वयातील मुलाची आत्मविश्वासपूर्ण कामगिरी पाहून त्याला 'नवा रॉक स्टार' म्हणून संबोधले जात आहे.शाळेचे मुख्याध्यापक संजीव सोनार यांच्याकडून मिळणाऱ्या निरंतर प्रेरणेमुळे दानिशचा आत्मविश्वास उंचावला आहे.सीबीएसई कोऑर्डिनेटर तेजस्विनी देसले यांनी वेळोवेळी दिलेल्या योग्य मार्गदर्शनामुळे दानिशची कला अधिक बहरली.आणि दानिशमधील सुप्त कला आणि त्याची गुणवत्ता ओळखून तिला वाव देण्याचे महत्त्वाचे काम वर्गशिक्षिका रश्मी होनमुटे यांनी केले आहे.शालेय शिस्त आणि कलेची योग्य सांगड घातल्यामुळेच आज दानिशच्या टॅलेंटचे सर्वत्र कौतुक होत आहे.त्याच्या रिल ची कॉपी करून अनेकांनी रिल्स बनवल्या आहेत.मा.महापौर यांनी केले दानिश चे विशेष कौतुक
मा. महापौर समीर राजुरकर यांना जेव्हा दानिश बद्दल कळले तेव्हा त्यांनी लगेच संजीव सोनार यांना फोन करून याची माहिती घेतली व त्यांनी दानिश चे विशेष कौतुक केले.या सोबतच त्याचे शिक्षक यांचे ही कौतुक केले.व अशाच प्रकारे मनपा शाळेचे नाव सर्वदूर पसरविण्यासाठी अधिक मेहनत घेण्याचे सांगितले.यासेबतच प्रभागाच्या नगरसेवक त्र्यंबक तुपे,जालिंदर शेंडगे ,नगरसेविका अर्चना नीलकंठ,अनिता मानकापे यांनीही त्याच्या या कामगिरीचे कौतुक केले.अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील,आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा,उप आयुक्त तथा विभाग प्रमुख अंकुश पांढरे,लाखिचंद चव्हाण,विकास नवाळे,शिक्षण अधिकारी भारत तीनगोटे,कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे यांनी स्नेह संमेलनात त्याचे कौतुक केले.मनपा मुख्यालयात दानिश चे गायनआज मनपा मुख्यालय येथे मां.आयुक्त महोदय यांनी आयोजित केलेल्या विभाग प्रमुख आढावा बैठकीत दानिश याला विशेष आमंत्रित करून त्याला गीत गाण्यास सांगितले व त्याचा सत्कार केला.या प्रसंगी सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.यावेळी आयुक्तांनी दानिश याला पियानो भेट देण्याचे सांगितले व दानिश व त्याच्या परिवाराला ईद निम्मित शुभेच्छा दिल्या.









