मनपाच्या रुग्णालयात अत्याधुनिक ‘गॅझेला HB इलेक्ट्रोफोरेसिस’ मशीनचे लोकार्पण; अवघ्या ८ मिनिटांत थॅलेसेमिया व सिकलसेल निदान शक्य”
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे महापौर मा. श्री. समीर राजूरकर, उपमहापौर मा. श्री. राजेंद्र जंजाळ, विरोधीपक्ष नेते मा. श्री. समीर साजिद, स्थायी समिती सभापती मा. श्री. अनिल मकरिये, वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समिती सभापती मा. डॉ. श्रीमती सुनिता सोळुंके तसेच मा. आयुक्त श्री. अमोल येडगे यांच्या आदेशानुसार व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाच्या वतीने दिनांक ८ मे “जागतिक थॅलेसेमिया दिन” सिडको एन-८ मनपा रुग्णालय येथे साजरा करण्यात आला.
भारतीय स्टेट बँकेच्या सीएसआर निधीतून प्राप्त ४ नवीन गॅझेला एचबी इलेक्ट्रोफोरेसिस मशीनचे लोकार्पण महापौर मा. श्री. समीर राजूरकर यांच्या शुभहस्ते हस्ते करण्यात आले. ही मशीन केवळ ८ मिनिटांत रक्ताच्या एका थेंबातून थॅलेसेमिया व सिकलसेल या रक्त विकाराचे निश्चित निदान होणार आहे. मशीन १००० चाचण्यांची नोंदीची साठवण क्षमता आहे. 8 हजार टेस्ट कार्ड मिळाले असून 22 हजार कार्ड सीएसआर फंड मार्फत मिळन्यासाठी प्रयत्न चालू आहेत.
शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आरोग्य विभागातर्फे १ ते ८ मे २०२६ दरम्यान “थॅलेसेमिया संकल्प सप्ताह” राबविण्यात आला.
ही अत्याधुनिक यंत्रणा थॅलेसेमियाचे जलद व अचूक निदान करण्यासाठी उपयुक्त ठरणार असून नागरिकांना आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेचे हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. या मशीनच्या माध्यमातून नागरिकांना कमी वेळेत अचूक तपासणी सुविधा उपलब्ध होणार असून थॅलेसेमियाचे वेळेत निदान व प्रतिबंध करण्यास मोठी मदत होणार आहे. शहरात प्रथमच अशी अत्याधुनिक मशीन मनपा आरोग्य केंद्र/ रुग्णालय येथे उपलब्ध झालेले आहे.
प्रत्येक गरोदर मातांची तपासणी करणे गरजेचे आहे. विशेषतः ज्या अति जोखमीच्या (High Risk) गरोदर माता आहेत व ज्यांचे हिमोग्लोबिन (Hb) कमी आहे, त्यांच्या तपासण्या करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच, जसे आपण विवाह जुळवताना पत्रिकेतील गुण पाहतो, त्याचप्रमाणे होणाऱ्या वधू-वरांची HB Electrophoresis चाचणी करणेही गरजेचे आहे. जेणे करून जन्मतः थॅलेसेमिया असलेले बाळ जन्माला येण्या पासून प्रतिबंद करणे शक्य होईल.
या कार्यक्रमात माननीय महापौर श्री. समीर राजूरकर, सभापती स्थायी समिती मा. श्री. अनिल मकरिये, सभापती वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समिती मा. डॉ. श्रीमती सुनिता सोळुंके, मा. अतिरिक्त आयुक्त श्री. रणजीत पाटील, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, भारतीय स्टेट बँकेचे प्रादेशिक अधिकारी श्री. पंकज कुमार, शाखा व्यवस्थापक श्री. इम्तियाज, माजी आय.एम.ए. सचिव डॉ. टाकळकर, नगरसेवक मा.श्री. विश्वनाथ स्वामी, मा.सौ. मीनाताई खरात, मा.सौ. माधुरीताई आव्हाड, मा.श्री. शिवाजी दांडगे, मा.श्री. गणेश नवांदर, डॉ. महेंद्रसिंह चव्हाण, सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. उज्वला भामरे, डॉ. राठोडकर, डॉ. प्रेरणा संकलेचा, डॉ. शैलजा ताठे,डॉ. सनोबर फातेमा, असिस्टंट मॅट्रन श्रीमती मीनल ठोकळ यांची प्रमुख उपस्थिती होती. सिडको एन-८ रुग्णालयचे सर्व कर्मचारी यांच्या नियोजनबद्द कार्यामुळे कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यात आले .





