महानगरपालिकेतर्फे सेवा हक्क दिवस साजरा.

महानगरपालिकेतर्फे सेवा हक्क दिवस साजरा.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने आज सेवा हक्क दिन साजरा करण्यात आला .

  महाराष्ट्र शासन निर्देशानुसार नागरिकांना महानगरपालिकेतर्फे दिल्या जाणाऱ्या अधिसूचित सेवा पारदर्शक ,गतिमान व विहित कालमर्यादेत देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनयम २०१५ अंतर्गत निर्देश देण्यात आले आहे.

    या नुसार छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने अधिसूचित केलेल्या सेवा महानगरपालिकेच्या https://chhsambhajinagarmc.org/links/dashboard या संकेतस्थळावर नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

   या अनुषंगाने आज मनपा मुख्यालय येथे मा.आयुक्त अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा हक्क दिन साजरा करण्यात आला.

शासन निर्देशानुसार या दिनानिमित मनपा अधिकारी कर्मचारी यांनी शपथ घेतली. मा.आयुक्त यांनी या शपथेचे वाचन केले.यावेळी अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील ,कल्पिता पिंपळे,उप आयुक्त विकास नवाळे,राहुल सूर्यवंशी,कार्यकारी अभियंता बाळासाहेब शिरसाट,अनिल तनपुरे,सर्व विभाग प्रमुख , शाखा प्रमुख ,अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

  सेवा हक्क दिना निम्मित मनपा मुख्यालयात मनपाच्या विविध विभाग यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या ८१ सेवांची माहिती मोठ्या फलकावर लावण्यात आली आहे.तसेच सर्व वॉर्ड कार्यालयात नागरिकांना देण्यासाठी माहिती पत्रक व बॅनर लावण्यात आले आहे.

    महापालिकेच्या वतीने नागरिकांना जनजागृतीसाठी SMS द्वारे माहिती पाठविण्यात आली.सर्व स.मनपा सदस्य आणि पदाधिकारी यांना what's app द्वारे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ कायदा ,शासन निर्णय राजपत्र व QR code इत्यादी माहिती पाठविण्यात आली.मनपा मुख्यालय येथे दोन स्टँडी लावण्यात आल्या असून यावर QR code देण्यात आला असून यावर स्कॅन केल्यावर सर्व सेवा ऑनलाईन दिसणार आहेत.