डोनाल्ड ट्रम्प यांची बुद्धी भ्रष्ट झाल्यामुळे त्यांनी जगाला नरकात ढकलण्याचे काम केले:रमेश कृष्णराव लांजेवार

डोनाल्ड ट्रम्प यांची बुद्धी भ्रष्ट झाल्यामुळे त्यांनी जगाला नरकात ढकलण्याचे काम केले:रमेश कृष्णराव लांजेवार

डोनाल्ड ट्रम्प यांची बुद्धी भ्रष्ट झाल्यामुळे त्यांनी जगाला नरकात ढकलण्याचे काम केले; त्यामुळे त्यांना दिवसरात्र 'नरक'दिसत असावे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या चुकीच्या कार्यशैलीमुळे जगावर आज तिसऱ्या महायुद्धाचे सावट निर्माण झाले आहे.याला कारणीभूत फक्त डोनाल्ड ट्रम्पच आहेत आणि आता इराण युध्दात होत असलेली पीछेहाट पाहुन ट्रम्प तिलमिला झाले असून वाटेल ते वक्तव्य करतांना दिसतात.अमेरिकी रेडिओ निवेदक आणि राजकीय भाष्यकार मायकेल सॅव्हेज यांच्या भारत आणि चीनवर अश्लाघ्य भाषेत टीका करणाऱ्या व्हिडिओची डोनाल्ड ट्रम्प यांनी भलामण केली.अमेरिकेच्या जन्मसिद्ध नागरिकत्वाबाबत भाष्य करताना भारत आणि चीन सारख्या देशांचा 'नरक'असा आक्षेपार्ह उल्लेख यामध्ये केला आहे.ट्रम्प यांनी हा व्हिडिओ रीपोस्ट केल्यावर सर्वत्र टीकेचा सूर उमटला.त्यानंतर त्यांनी सारवासारव करत,"भारत हा महान देश असून,त्याचे प्रमुख माझे चांगले मित्र आहोत"असे अधोरेखित केले.अशाच विचलित वक्तव्याच्या कारणास्तव दुसऱ्या फेरीची शांती वार्ता निष्फळ ठरली.कारण शांती वार्तेची चर्चा सुरू असतांना डोनाल्ड ट्रम्प इराणवर फक्त धमक्यांचा वर्षाव करीत आहेत,त्यामुळे दुसऱ्या फेरीची शांती वार्ता फेल झाली आणि पुन्हा युद्धाची दाट शक्यता वाढली आहे.कारण ट्रम्प यांच्या जिभेला हाड नसल्याने अमेरिका-इराण शांती वार्ता शक्य नाही.कारण वारंवार आपले वक्तव्य बदलवुन ट्रम्प इराणची व जगाची दिशाभूल करीत आहे.यामुळेच दुसऱ्यांना 'नरक' म्हणून संबोधणारे डोनाल्ड ट्रम्प यांच्या विषेली वक्तव्यामुळे जगावर महायुद्धाचे काळे ढग निर्माण झाले आणि आता भारत-चीनची तुलना 'नरक'अशी करतात म्हणून त्यांच्या कोणत्याही शब्दावर कोणीही विश्वास ठेवण्यास तयार नाही त्याचा परिणाम म्हणून युद्ध पुन्हा भडकु शकते.दिनांक २८ फेब्रुवारीला अमेरिकेने इराणवर अचानक हल्ला करून जगाला महायुध्दाच्या खाईत लोटुन जगाला आर्थिक आणि मानवीय अडचणीत टाकले व जगाला सामंजस्यमध्ये आणले आणि आता शांती वार्ता सुरू असतांना सुध्दा वेळोवेळी इराणला धमकी देण्याचे काम करीत आहेत.त्यामुळे एकाच वेळेस दोन गोष्टी होवू शकत नाही.एकतर शांती वार्ता किंवा युद्ध हाच पर्याय आहे.अशा परिस्थितीत इराण शांतीवार्ताच्या दुसऱ्या फेरीतून बाहेर पडला आहे.यामुळे इराण-अमेरिका -इजरायल युद्ध केंव्हाही कधीही भडकू शकते याला नाकारता येत नाही. या युध्दाची मुख्य जड डोनाल्ड ट्रम्प आहे.कारण डोनाल्ड ट्रम्प मिडिया समोर येऊन केव्हा काय बोलतील याचा कोणालाच भरोसा रहाला नाही.आज अमेरिकन जनतेसह संपूर्ण जग डोनाल्ड ट्रम्पला विश्व शांतीचा हत्यारा समजत आहे.अमेरिकेने नेहमीच अनेक देशांना रक्ताच्या लाथोळ्यात सोडून पळ काढला ही बाब जगातील अनेक देशांना चांगल्याप्रकारे ग्यात आहे आणि त्याचीच पुनरावृत्ती पश्चिम आशियातील ( मिडलिस्ट) देशांची करून ठेवली आहे. त्याचप्रमाणे डोनाल्ड ट्रम्प आपली करारी हार लक्षात घेता, मिडलिस्टला रक्ताच्या लाथोळ्यात सोडून पसार होण्याच्या तयारीत होते.परंतु त्यांना तोंड लपवायला जागा नसल्याने पुन्हा युद्धाच्या तयारी लागले आहेत. आज जे पश्चिम आशियात भितीचे वातावरण आणि मृत्यू तांडव निर्माण झाले आहे याला कारणीभूत फक्त डोनाल्ड ट्रम्पच आहे असे मला वाटते.कारण त्यांच्या छोट्याशा चुकीच्या निर्णयामुळे व वक्तव्यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत गेली आणि याचे रूपांतर युद्धात झाले.यावरून स्पष्ट होते की, डोनाल्ड ट्रम्प यांचे मानसिक संतुलन ढासळले असुन त्यांच्यावर कोणीही विश्वास ठेवण्यास तयार नाही.इराण- अमेरिका-इजरायल यांच्या युद्धापासुन,नाटो देश, भारत, चीन, रशिया दुरू असतांना सुध्दा अमेरिकेने नाटो देशांना खडे बोल सुनावले आणि आता डोनाल्ड ट्रम्प भारत-चीनला (हेलहोल) "नरक" म्हणून संबोधतात ही तर भारताच्या बाबतीत डोनाल्ड ट्रम्प यांनी संपूर्ण हद पार केल्याचे लक्षणच म्हणावे लागेल. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या वागण्यावरून व बोलण्यावरून स्पष्ट होते की,त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहेत यामुळे त्यांच्या जीभेला हाड रहाले नाही.डोनाल्ड ट्रम्प आधी भारताला नरक म्हणून संबोधतात आणि आता सारवासारव करून भारताला "महान देश" म्हणून उल्लेख करतात यावरून स्पष्ट होते की गेल्या ५७ दिवसात त्यांनी जगाला विचलित करणारे वक्तव्य केले असून हे सर्व मुर्खपणाचे लक्षण आहे.एकीकडे अमेरिका शांतीवार्ताची पहल करीत आहे तर दुसरीकडे अमेरिकेने संपूर्ण पश्चिम आशियात आपले सैन्य जाळे विणुन इराणची नाकाबंदी करण्यास सुरुवात केली आहे.पश्चिम आशियात आपली सैन्य ताकद मजबूत करण्यासाठी तिसरी अण्वस्त्रसज्ज विमानवाहू नौका " यूएसएस जॉर्ज एचडब्ल्यू बुश"(सीव्हीएन-७७) आता इराणच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे.लाल समुद्रातील धोकादायक मार्ग टाळून ही युद्धनौका आफ्रिकेचे दक्षिण टोक म्हणजेच केप ऑफ गुड होपला वळसा घालून पश्चिम आशियात तैनात केली आहे.हे अमेरिकन नौदलाचे "निमित्झ क्लास"मधील १० वे आणि शेवटचे सुपर कॅरियर आहे.यावरून स्पष्ट होते की,एकिकडे सैन्य तैनाती आणि दुसरीकडे शांती वार्ता या दोन्हीही गोष्टी एकाच वेळी शक्य नाही.त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचे तत्व जगाला पटणारे दिसत नाही.आज जगात ज्या सामुद्रधुनी मधुन २५ टक्के तेल वाहू जहाजांचे आवागमन होते तीथे निर्माण झालेल्या कोंडीचा सुत्रधार डोनाल्ड ट्रम्पच आहे.त्यमुळे आज अनेक देशांचे हजारो जहाज होर्मुझच्या आसपास अडकले आहेत. ट्रम्पने जर युद्ध छेडले नसते तर आज होर्मुझ सर्वांसाठी खुला रहाला असता.परंतु अमेरिकेच्या अरेरावीमुळे इराणने होर्मुझवर आपली पकड मजबूत केली आहे आणि त्याचा परिणाम आज जगातील अनेक देशांना भोगावा लागतो आहे आणि याला जबाबदार फक्त डोनाल्ड ट्रम्पच आहेत. अनिश्चित काळासाठी युद्ध विराम झाला आहे आणि शांती वार्ता बंद -सुरू अशा व्दीधा परिस्थितीत आहे, तरी ट्रम्प यांचा धमक्यांचा वर्षाव थांबलेला नाही.ट्रम्प यांनी नौदलाला आदेश दिला आहे की, होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या इराणच्या छोट्या नौका दिसताच त्याला गोळ्या घालून नष्ट करा असा आदेश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्या नौदलाला दिला आहे. अशाप्रकारे ट्रम्प या युध्दाला चिघळविण्याचे काम करीत आहेत.कारण अमेरिकेने जर युध्दाला सुरुवात केली तर, त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी इराण सज्ज आहे असे इराणच्या सुत्रांनी सांगितले आहे.