शहागंज–सिटीचौक रस्त्यावरील हातगाड्यांविरोधात ऋषिकेश जैस्वाल आक्रमक, कारवाई नाही तर १० मार्चपासून ‘शिवसेना स्टाईल’ उत्तर देण्याचा इशारा

छत्रपती संभाजीनगर शहरातील शहागंज ते सिटीचौक रस्त्यावर वाढलेल्या हातगाडी व्यवसायिकांविरोधात नगरसेवक ऋषिकेश जैस्वाल आक्रमक झाले आहेत. रस्त्यावर वाढलेल्या हातगाड्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याचा आरोप करत त्यांनी कारवाईची मागणी केली आहे.

यासंदर्भात सिटी चौक पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षकांना त्यांनी पत्राद्वारे हातगाडी धारकांवर कारवाई करण्याची विनंती केली आहे. शहागंज ते सिटीचौक या मार्गावर मोठ्या प्रमाणात हातगाड्या उभ्या राहत असल्याने नागरिक आणि वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

तसेच, जर प्रशासनाने तात्काळ कारवाई केली नाही तर १० मार्चपासून “शिवसेना स्टाईल” उत्तर देण्यात येईल, असा इशाराही ऋषिकेश जैस्वाल यांनी दिला आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे आता प्रशाgसन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.