जागतिक महिला दिनानिमित मनपा महिला अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित मनपा महिला अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने आज जागतिक महिला दिनानिमित्त उत्कृष्ट काम करणाऱ्या मनपा अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार सोहळा मनपा मुख्यालय येथेआयोजित करण्यात आला होता.

   या सत्कार सोहळ्याचे उद्घाटन मां.महापौर समीर राजुरकर यांनी दीप प्रज्वलन करून केले.यावेळी उप महापौर राजेंद्र जंजाळ,विरोधी पक्ष नेता अब्दुल समीर साजिद,अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे,रणजीत पाटील,उप आयुक्त तथा विभाग प्रमुख लखीचंद चव्हाण,विकास नवाळे,अंकुश पांढरे,अपर्णा थेटे ,आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ पारस मंडलेचा आदींची उपस्थिती होती.

   यावेळी मां.महापौर यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व क्रांती ज्योती सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी उप महापौर राजेंद्र जंजाळ,विरोधी पक्ष नेता अब्दुल समीर साजिद,नगरसेविका माधुरी देशमुख,कीर्ती शिंदे,सुरेखा सानप,शिल्पा राणी वाडकर शोभा बुरांडे, सुमित्रा मात्रे, सुरेखा गायकवाड, कमल नरोटे सुनीता सोळुंके, सत्यभामा शिंदे, मुक्ताकिशन ठूबे, गंगाबाई भवरे आणि स. नगरसेवक जालिंदर शेंडगे, पद्मसिंह राजपूत, नंदू गवळी, ऋषिकेश जैस्वाल, काकासाहेब काकडे आणि अशोक दामले यांची उपस्थिती होती.

यावेळी मां. महापौर यांनी सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट काम करणाऱ्या ९८ महिला अधिकारी कर्मचारी यांचा गुलाब पुष्प,प्रमाणपत्र व गिफ्ट देऊन सत्कार करण्यात आला.

    यावेळी महिलांसाठी विविध मनोरंजक खेळ घेण्यात आले.तसेच सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला .यात महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदवला.