मनपा विद्यार्थ्यांना मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास समजणार मुकुंदवाडी व चिकलठाणा शाळेतील १२० विद्यार्थ्यांची संग्रहालयास भेट

मनपा विद्यार्थ्यांना मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास समजणार मुकुंदवाडी व चिकलठाणा शाळेतील १२० विद्यार्थ्यांची संग्रहालयास भेट

 छत्रपति संभाजीनागर दि. ११ सप्टेंबर

मराठवाडा मुक्ती संग्रामाचा गौरवशाली इतिहास महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून समजावा, या उद्देशाने मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठवाडा मुक्ती संग्राम संग्रहालय भेटीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

या उपक्रमाच्या प्रारंभी महानगरपालिका माध्यमिक शाळा, मुकुंदवाडी आणि महानगरपालिका माध्यमिक शाळा, चिकलठाणा येथील एकूण १२० विद्यार्थ्यांनी आज मराठवाडा मुक्ती संग्राम संग्रहालयास भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी संग्रहालयातील ऐतिहासिक वस्तू, छायाचित्रे व स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित माहिती जाणून घेत मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास समजून घेतला.

महानगरपालिकेच्या शाळांमधील इयत्ता नववी व दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना संग्रहालय भेटीचा लाभ मिळावा, यासाठी दररोज दोन शाळांतील विद्यार्थ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम दि. २४ सप्टेंबर २०२६ पर्यंत सुरू राहणार असून, त्यातून विद्यार्थ्यांमध्ये ऐतिहासिक जाणीव, देशभक्ती आणि स्वातंत्र्यलढ्याबद्दल अभिमानाची भावना निर्माण होण्यास मदत होणार आहे.

या उपक्रमाचे नियोजन उपायुक्त अंकुश पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे यांनी केले. यावेळी मुकुंदवाडी शाळेचे मुख्याध्यापक संतोष तपकिरे तसेच शिक्षक विद्यार्थ्यांसमवेत उपस्थित होते.