प्लास्टिक विक्रेत्यांवर मनपाची सलग तिसऱ्या दिवशी धडक कारवाई.
प्लास्टिक विक्रेत्यांवर मनपाची सलग तिसऱ्या दिवशी धडक कारवाई, 1000 किलो पेक्षा प्रतिबंधित प्लास्टिक केले जप्त, अनेक छोट्या मोठ्याव विक्रेत्यांवर कारवाई; ₹ 37000 दंड ठोठावला.
व्यावसायिकांनी स्वतःहून जमा केले प्रतिबंधित प्लास्टिक
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची सलग तिसऱ्या दिवशी प्लास्टिक विरोधात धडक कारवाई, विविध छोट्या मोठ्या प्लास्टिक व्यावसायिकांच्या दुकानांवर गोडाऊनवर धडक कारवाई मध्ये 1000 किलो पेक्षा जास्त प्लास्टिक जप्त करून शहरात झालेल्या अनेक कारवाई मध्ये 37000 हजार रुपये केला दंड. गेल्या तीन दिवसा पासून चालू असलेल्या ह्या कारवाई मध्ये आतापर्यंत 11000 किलो पेक्षा जास्त प्लास्टिक केले जप्त आहे. ज्यात जवळपास 40 लाख पिशव्या तसेच अनेक वस्तू वापरात येण्यापासून रोखण्यात मनपाला यश आले आहे.
सततच्या छापेमारीमुळे नियमभंग करणाऱ्यांमध्ये खळबळ छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत शहराला प्लास्टिकमुक्त करण्यासाठी राबविण्यात येणारी कठोर व सातत्यपूर्ण मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून, आज दिनांक 24/04/2026 रोजी पुन्हा एकदा बेकायदेशीर प्लास्टिक साठा करणाऱ्या विक्रेत्यांवर निर्णायक कारवाई करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने आज शहरातील मध्यवर्ती भागात सलग तिसऱ्या दिवशी नागरी मित्र पथकाद्वारे प्लास्टिक विक्रेत्यांवर धडक कारवाई करून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले.
गेल्या दोन तीन दिवसापासून चालू असलेल्या ह्या कारवाई मध्ये जवळपास 11000 किलो पेक्षा जास्त एकल प्लास्टिक महानगरपालिकेने जप्त करून त्याची विल्हेवाट लावली आहे, जेणेकरून ते प्लास्टिक परत वापरात येऊ नये.
या कारवाईच्या धास्तीने शहरातील काही प्लास्टिक विक्रेत्यांनी स्वतःहून प्रतिबंधित प्लास्टिक घनकचरा व्यवस्थापन विभाग छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका येथे जमा केले आहे.
मोठ्या कारवायांचा धडाका कायम राहणार असून गेल्या काही दिवसांत महानगरपालिकेकडून शहरातील विविध भागांत अचानक छापेमारी करून हजारो किलो प्लास्टिक साठा जप्त करण्यात आला आहे. या सातत्यपूर्ण कारवायांमुळे नियमभंग करणाऱ्या छोट्या मोठ्या सर्व व्यवसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, मनपाने आपली भूमिका अधिकच आक्रमक केली आहे.
मनपा प्रशासनाचा स्पष्ट इशारा दिला आहे की प्लास्टिक साठा, विक्री किंवा वापर याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. नियमभंग आढळल्यास अचानक छापेमारी करून दंडात्मक कारवाई केली जाईल. आवश्यकतेनुसार साठा जप्ती, दंड आणि पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
महानगरपालिका उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी सांगितले की यानंतर सुद्धा शहरात प्रतिबंधित प्लास्टिक विक्रेते विरोधात नियमितपणे कारवाई करणे चालू राहणार तसेच नागरिकांमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकचा वापरबंद करण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे तसेच प्लास्टिक विक्रेत्या व्यावसायिकांना नागरिकांसाठी पर्याय उपलब्ध करून देण्याबाबत महानगरपालिका मदत करणार आहे तसेच जनजागृती करण्यात येणार आहे.
शहरात प्रतिबंधित प्लास्टिकची वाहतूक व विक्री मोठ्या प्रमाणावर होत असल्याने मनपा आयुक्त श्री. अमोल येडगे सर यांच्या आदेशानुसार व उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख श्री. नंदकिशोर भोंबे मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त रमेश मोरे, नागरी मित्र पथक कर्मचारी देविदास सुसर, बालाजी साबळे, सुवर्णसिंग परदेशी, जनार्दन सांगळे, यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली. यावेळी या पथकाच्या सोबतीला घनकचरा व्यवस्थापन विभागाचे स्वच्छता अधिकारी अनिल जाधव, स्वच्छता निरीक्षक सचिन मिसाळ,वंदना पवार, रीमा मलके, तसेच स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.





