मराठवाडा मुक्ती संग्राम इतिहासावर विद्यार्थ्यांना बक्षीस दिले जाणार आयुक्त अमोल येडगे साहेब

मराठवाडा मुक्ती संग्राम इतिहासावर विद्यार्थ्यांना बक्षीस दिले जाणार आयुक्त अमोल येडगे साहेब

मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी साधला विद्यार्थ्यांसोबत संवाद 

  मराठवाडा मुक्ती संग्राम ची माहिती विद्यार्थ्यांना झाली पाहिजे म्हणून महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून मनपा माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांची भेटीचे नियोजन करण्यात आले आहे आतापर्यंत 6 शाळांनी भेट दिली आहे आज मनपा माध्यमिक शाळा मिटमिटा आणि बेगमपुरा या शाळेतील विद्यार्थ्यांनी संग्रहालय भेट दिली संग्रहालय पाहून झाल्यानंतर विद्यार्थ्यांसोबत स्वतः आयुक्त अमोल येडगे यांनी संवाद साधला आणि विद्यार्थ्यांना मराठवाडा मुक्ती संग्राम केव्हा झाला तसेच या संग्राम मध्ये कोणकोणते थोर नेत्यांनी सहभाग घेतला होता तुम्हाला संग्रहालयाला भेट देऊन चांगली माहिती मिळाली असेल याची माहिती मनपाच्या सर्वच शाळेतील भेट दिलेल्या विद्यार्थ्यांनी त्याच दिवशी संध्याकाळी लिहावी आणि ती आपल्या शिक्षका कडे जमा करावी त्यामधून उत्कृष्ट माहिती ज्यांनी लिहिली असेल त्यांना बक्षीस दिले जाईल असे आयुक्त अमोल येडगे यांनी सांगितले .

 या भेटीच्या वेळी अंकुश पांढरे , विकास नवाळे उपायुक्त तसेच विजय पाटील उद्यान प्रमुख ज्ञानदेव सांगळे कार्यक्रम अधिकारी आणि सर्वेश नांद्रेकर सांस्कृतिक अधिकारी ,संजीव बालिया क्रीडा अधिकारी आणि सागर मगरे क्रीडा समन्वयक तसेच शाळेचे शिक्षक उपस्थित होते.