कर्करोगा विरुद्ध् संरक्षण कवच एच पी व्ही लसीकरण मोहीम विषयी कमिशनर टास्क फोर्स बैठक संपन्न

कर्करोगा विरुद्ध् संरक्षण कवच एच पी व्ही लसीकरण मोहीम विषयी कमिशनर टास्क फोर्स बैठक संपन्न

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे मा. आयुक्त श्री. जी. श्रीकांत सर यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार मा. अतिरिक्त आयुक्त श्री. रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज दि. 16/03/2026 रोजी एच.पी.व्ही लसीकरण मोहीम विषयी कमिशनर टास्क फोर्स बैठक पार पडली. या बैठकीचे प्रास्ताविक डॉ. उज्वला भामरे, सहाय्यक आरोग्य अधिकारी यांनी केले.

आपल्या देशात गर्भाशय मुखाचा कर्करोग हा स्त्रियांमध्ये होणाऱ्या स्तनाच्या कर्करोगानंतर दुसऱ्या क्रमांकाचा कर्करोग आहे. एच.पी.व्ही लस ही मुलीनां भविष्यात होऊ शकणाऱ्या गर्भाशय मुखाच्या कर्करोगास संरक्षण देणारी आहे. ही लस 14 ते 15 वयोगटातील मुलींना मोफत देण्यात येणार आहे. उपरोक्त लस ही सुरक्षित आहे. एच.पी.व्ही. लसीकरण मोहिम शासनाच्यावतीने राबविण्यात येत आहे.

सदरील मोहीमेसाठी महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात 14 ते 15 वर्ष वयोगटातील 12961 मुलींना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सदरील बैठकीत मा. आरोग्य सभापती डॉ. सुनिता सोळुंके यांनी लसीकरण मोहीमेचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना देऊन आपल्या मुलींना लसीकरण करण्यासाठी जास्तीत जास्त पालकांनी या मोहीमेत सक्रिय सहभाग घेऊन लसीकरण करुन घेण्याचे आवाहन केले. शाळेमध्ये शिक्षक व पालकांची बैठक आयोजित करुन त्याठिकाणी बालरोग तज्ञ यांच्याद्वारे पालकांच्या मनामध्ये असणाऱ्या एच.पी.व्ही लसीकरणाबाबतच्या शंकांचे निरसन करण्यात येणार आहे. उपरोक्त मोहीम मनपाच्या 5 (बन्सीलालनगर, सिडको एन-8, सिल्कमिल, कैसरकॉलनी आणि सिडको एन-11) या रूग्णालयांमधून सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत घेण्यात येणार आहे. टप्याटप्याने अजून काही आरोग्य केंद्रातून ही मोहीम सुरू करण्यात येणार आहे.  

तसेच आय.एम.ए, स्त्रीरोग संघटना, बालरोग संघटना यांच्या वतीने एच.पी.व्ही लस सुरक्षित असून ही प्रत्येक पालकांनी आपल्या मुलींना घेण्याबाबत प्रवृत्त करावे असे आवाहन करण्यात आलेले आहे.

सदरील बैठकीस मा. आरेाग्य सभापती डॉ. सुनिता सोळुंके, मा. अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील,  मा. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, जागतिक आरोग्य संघटनेचे एस.एम.ओ डॉ. मुजीब सैय्यद, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. उज्वला भामरे, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. मेघा जोगदंड, आरोग्य अधिकारी डॉ. बी.डी. राठोडकर, AEFI कमिटी नोडल अधिकारी डॉ. लिना सोनी, आय.एम.ए. अध्यक्ष डॉ. अनुपम टाकळकर, स्त्रीरोग संघटनचे अध्यक्ष डॉ. विनायक खेडकर, बालरोग तज्ञ संघटनेचे अध्यक्ष, डॉ. संध्या कोंडपल्ले, पी.आर.ओ खाजा अलिमोद्दीन, इस्लामिक रिसर्च सेंटर प्रतिनिधी, महिला व बालसंगोपन अधिकारी गणेश पुंगळे, एम.जी.एम बालरोग विभाग प्रमुख माधुरी ईगांडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय बालरोग विभागाचे डॉ. ऊबेद, बालरोग विभाग हेडगेवार रुगणालयाचे प्रतिनिधी, डॉ. रश्मी शिरोडकर, महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी भारत तीनगोटे, जनसंपर्क विभागाचे प्रतिनिधी, माध्यमिक शिक्षण विभागाचे प्रतिनिधी प्रविण खरे आदिंची उपस्थिती होती.