सर्व पक्षीय मुस्लिम आघाडीची स्थापना सामाजिक न्यायासाठी नवी चळवळ.

सर्व पक्षीय मुस्लिम आघाडीची स्थापना  सामाजिक न्यायासाठी नवी चळवळ.

छत्रपती संभाजीनगर .

समाजातील गरीब, शोषित आणि वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व पक्षीय मुस्लिम आघाडीची औपचारिक स्थापना करण्यात आली आहे. या आघाडीचा उद्देश राजकारणाच्या पलीकडे जाऊन मानवी सेवा, सामाजिक न्याय आणि एकात्मता साधणे हा आहे.

आघाडीची प्रमुख कार्यप्रणाली

गरीब, शोषित, कामगार, शेतमजूर, झोपडपट्टीवासी, अपंग, विधवा व अनाथांसाठी मदतकार्य

बेरोजगार युवक-युवतींना रोजगार मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन व समुपदेशन

अतिवृष्टी, दुष्काळ, आगजनीसारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये बाधित कुटुंबांना तातडीचे सहाय्य

मोफत वैद्यकीय शिबिरे आयोजित करून औषधोपचार व वैद्यकीय साहित्याची मदत

गरजू नागरिकांना कायदेशीर सल्ला व न्यायालयीन प्रक्रियेसाठी सहाय्य

पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण अशा मूलभूत गरजांसाठी प्रशासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा

नव्या कार्यकारिणीची घोषणा

संस्थापक अध्यक्ष: साजीद मौलाना.

सरचिटणीस : शेख सलीम (निवृत्त प्राचार्य)

उपाध्यक्ष: बनेखाँ पठाण, हफीज अली, सलीम चिस्ती

सरचिटणीस: अशरफ पठाण

सहसचिव: नईम बक्ष

सचिव: डॉक्टर शकील शेख, खिझर सिद्दिकी

प्रसिद्धी प्रमुख: अब्दुल कय्यूम

यावेळी बोलताना संस्थापक अध्यक्ष साजीद मौलाना म्हणाले,

“आज समाजातील अनेक घटक मूलभूत हक्कांपासून दूर आहेत. धर्म, पक्ष किंवा जात न पाहता प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत मदत पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे. ही आघाडी केवळ संघटना नसून, पीडितांच्या अश्रूंना पुसणारा आणि त्यांच्या आशेला बळ देणारा एक विश्वासाचा आधार ठरेल.”

एकजुटीचा संदेश

सर्व पक्षीय मुस्लिम आघाडीच्या स्थापनेमुळे समाजसेवा, आपत्ती मदत, आरोग्य व रोजगार या क्षेत्रांत समन्वयाने काम होणार असून, एकजूट, संवेदनशीलता आणि सेवा या मूल्यांवर आधारित नवी दिशा मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.