व्हॉईस ऑफ मीडिया व डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटल तर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन.

व्हॉईस ऑफ मीडिया व डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटल तर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन.
व्हॉईस ऑफ मीडिया व डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटल तर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन.
व्हॉईस ऑफ मीडिया व डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटल तर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन.

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : व्हॉईस ऑफ मीडिया व डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटल तर्फे कामगार दिनानिमित्त पत्रकार व त्यांच्या परिवाराच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असून, बुधवार, ६ मे २०२६ रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबिर आंतरराष्ट्रीय अध्यक्ष तथा संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार असून, पत्रकार बांधवांसाठी ही एक उपयुक्त व आरोग्यदायी संधी ठरणार आहे.

दिनांक: बुधवार, ६ मे २०२६

 वेळ: सकाळी ९:३० ते सायं. ६:००

स्थळ: नूर हॉस्पिटल, बायजीपुरा, गल्ली नं. २६

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) – ४३१००२

पत्रकारांचे काम हे अत्यंत धावपळीचे आणि ताणतणावाचे असते. दिवसभर घटनास्थळी फिरून बातम्या गोळा करणे आणि त्यानंतर संगणकासमोर बसून बातम्या तयार करणे, या प्रक्रियेमुळे त्यांच्या डोळ्यांवर मोठा ताण येतो. याच पार्श्वभूमीवर व्हॉईस ऑफ मीडिया व डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटल तर्फे या मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये व्हॉईस ऑफ मीडिया व डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त पुढाकारातून अनुभवी नेत्रतज्ज्ञांकडून डोळ्यांची सखोल तपासणी करण्यात येणार असून, आवश्यक त्या वैद्यकीय सल्ल्याचाही लाभ उपस्थितांना मिळणार आहे.

या उपक्रमाबाबत व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अब्दुल कय्यूम यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की,

"व्हॉईस ऑफ मीडिया व डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटल तर्फे पत्रकारांच्या आरोग्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पत्रकार हे समाजाचे डोळे आहेत. त्यांच्या कामाच्या स्वरूपामुळे डोळ्यांवर मोठा ताण येतो, त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही आमची जबाबदारी आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही व्हॉईस ऑफ मीडिया व डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटल तर्फे नेत्र शिबिर आयोजित करून पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांना मोफत तपासणीची संधी उपलब्ध करून देत आहोत."

व्हॉईस ऑफ मीडिया व डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटल तर्फे पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या उपक्रमासाठी परवेज खान (राष्ट्रीय संघटक संस्थापक) तसेच डॉ. शेख शकील (जिल्हाध्यक्ष) यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.

📞 संपर्क:

अब्दुल कय्यूम – ९१५८८४७१११

डॉ. शेख शकील – ९३२६५६७९९९