भव्य लॅप्रोस्कोपिक स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

भव्य लॅप्रोस्कोपिक स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे महापौर मा. श्री. समीर राजूरकर,  उपमहापौर मा. श्री. राजेंद्र जंजाळ  तसेच मा. आयुक्त श्री. जी. श्रीकांतसर यांच्या आदेशानुसार व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाच्या वतीने दि.18/02/2026 रोजी सिडको एन-8 रुग्णालय येथे 10 महिलांवर यशस्वीपणे मोफत लॅप्रोस्कोपिक स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. आत्तापर्यंत महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये आयोजित मोफत लॅप्रोस्कोपिक शिबिरांच्या माध्यमातून एकूण 160 महिलांवर मोफत स्त्री कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या आहेत.

मोफत लॅप्रोस्कोपिक (दुर्बिणीद्वारे) कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया या आधुनिक, सुरक्षित व अल्पकालीन विश्रांतीची आवश्यकता असलेल्या पद्धती असून महिलांसाठी वेदनामुक्त व जलद आरोग्यलाभ देणाऱ्या ठरत आहेत. या शस्त्रक्रियांमुळे महिलांच्या आरोग्याबरोबरच कुटुंबाच्या आर्थिक व सामाजिक स्थैर्याला देखील बळकटी मिळत आहे.

उपरोक्त शिबिर यशस्वी होण्यासाठी डॉ. नरवणे, डॉ. शिरसाट, डॉ. दौंड, डॉ. मेघा जोगदंड, डॉ. गायकवाड, डॉ. कल्पना राठोड, देवगंणा शेळके, बनकर सिस्टर, सोनटक्के सिस्टर, भुरके सिस्टर, वर्षा सिस्टर, आनंद बेंद्रे, अंकिता सिस्टर, गीता हलगडे, वंदना साळवे, शुभांगी सिस्टर, लांडगे, जोशी व सिडको एन-8 चा सर्व कर्मचारी यांच्या नियोजनबद्  कार्यामुळे शिबिर यशस्वीपणे पार पडण्यात आले .

यापुढेही मनपाच्या पाच रुग्णालयांमधून ( सिडको एन-8, सिडको एन- 11, सिल्क मिल कॉलनी, कैसर कॉलनी, नेहरूनगर ) नियमितपणे लॅप्रोस्कोपीक स्री कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. तरी जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन महानगरपालिका छत्रपती संभाजी नगर तर्फे करण्यात येत आहे.