औषध विक्रेत्यांचा दि.२० रोजी नियोजीत बंद; अत्यावश्यक औषधे खरेदी करुन ठेवण्याचे आवाहन.
छत्रपती संभाजीनगर:- अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने बुधवार दि.२० रोजी बंद पुकारला आहे. ज्या रुग्णांना नियमित औषधांची आवश्यकता असते त्यांनी आपली गैरसोय टाळण्यासाठी आपली आवश्यक औषधे आगाऊ खरेदी करुन ठेवावी. बंद कालावधीत औषधे उपलब्ध न झाल्यास रुग्णांनी सहायक आयुक्त शा. ना. साळे (8983290162), वि. वि. नांगरे (7387561343) व औषध निरीक्षक म. भा. पैठणे (9021899018) यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा,असे आवाहन छत्रपती संभाजीनगर परीमंडळ -२ चे सहा.आयुक्त (औषधे) वि.वि. नांगरे यांनी केले आहे.







