ईरान–इजराइल संघर्ष थांबवण्यासाठी भारताने मध्यस्थी करावी – ऑल इंडिया उलमा बोर्डचे निवेदन

ईरान–इजराइल संघर्ष थांबवण्यासाठी भारताने मध्यस्थी करावी – ऑल इंडिया उलमा बोर्डचे निवेदन

छत्रपती संभाजीनगर 

मध्य पूर्वेत वाढत चाललेल्या ईरान–इजराइल संघर्षामुळे जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया उलमा बोर्डतर्फे भारत सरकारने मध्यस्थी करून युद्ध तात्काळ थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी करणारे निवेदन विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत पंतप्रधान Narendra Modi यांना पाठविण्यात आले आहे.

हे निवेदन शहराध्यक्ष अशरफ पठाण यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले असून या युद्धामुळे जगभरातील निरपराध नागरिकांवर मोठे संकट आले आहे. महिला, मुले आणि सामान्य नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत असून मानवतेवर गंभीर परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, कोणत्याही प्रकारचे युद्ध हे मानवतेसाठी घातक असते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्व देशांनी शांततेच्या मार्गाने हा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणे अत्यंत गरजेचे आहे. भारत हा जगातील प्रभावी देश असून भारत सरकारने राजनैतिक पातळीवर पुढाकार घेऊन या संघर्षावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करावेत.

शहर उपाध्यक्ष शेख आमेर (बाबा) यांनी सांगितले की,

“ईरान–इजराइल युद्धामुळे संपूर्ण जग अस्वस्थ झाले आहे. हजारो निरपराध नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत. भारत सरकारने तातडीने मध्यस्थी करून हे युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत, ही काळाची गरज आहे. मानवता आणि जागतिक शांतता टिकवण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येणे आवश्यक आहे.

शहराध्यक्ष अशरफ पठाण यांनी सांगितले की,

“ईरान–इजराइल संघर्षाचा परिणाम आपल्या देशावरही होत आहे. गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्यामुळे अनेक हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसाय अडचणीत आले आहेत. घरगुती गॅस पुरवठ्यावरही परिणाम होत असल्याने सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे भारत सरकारने तातडीने मध्यस्थी करून हा संघर्ष थांबवावा.”

शेख आसिफ यांचे मत

प्रदेशाध्यक्ष शेख आसिफ यांनीही या युद्धाबद्दल चिंता व्यक्त करताना सांगितले की,

“हे युद्ध तातडीने थांबले नाही तर भविष्यात परिस्थिती अधिक भयानक होऊ शकते. शांततेसाठी प्रत्येकाने आपल्या परीने प्रयत्न करणे आवश्यक आहे.”

यावेळी त्यांनी एक अर्थपूर्ण शेर सांगितला –

“एक शैतान आग लगाता है,

एक चिड़िया चोंच में पानी लेकर आती है।

शैतान कहता है – तेरे पानी से क्या होगा?

चिड़िया कहती है – जब भी आग बुझाने वालों का नाम लिया जाएगा,

उसमें मेरा नाम भी शामिल होगा।”

या निवेदनावर प्रदेशाध्यक्ष शेख आसिफ, शहराध्यक्ष अशरफ पठाण, शेख कय्यूम, शहर उपाध्यक्ष शेख आमेर (बाबा), मुजीब खान, शेख मुद्दस्सीर, अब्दुल्लाह भाई

तहसीलदार Bhadane यांना निवेदन देण्यात आले 

आदींच्या स्वाक्षऱ्या असून विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत हे निवेदन केंद्र

 शासनाकडे पाठवण्यात आले आहे.