बलात्कारी व भ्रष्टाचारी यांना तुरुंगात नाही;तर फास्टट्रॅक कोर्टच्या माध्यमातून फासावर लटकविले पाहिजे.

बलात्कारी व भ्रष्टाचारी यांना तुरुंगात नाही;तर फास्टट्रॅक कोर्टच्या माध्यमातून फासावर लटकविले पाहिजे.

देशाचे अट्टल गुन्हेगार लैंगिक अत्याचारी व भ्रष्टाचारी आहेत कारण या दोन्ही गुन्हेगारांनी देशाचे संपूर्ण वाटोळे केले आहे. अत्याचाऱ्यांनी देशाच्या सभ्यतेवर व संस्कृतीवर काळीमा फासला;तर भ्रष्टाचाऱ्यांनी देशाच्या गोरगरीब जनतेचे रक्त पिऊन देशाला हवालदिल केले आहे.देशात वाढते मुलींवरील व महिलांवरील अत्याचार,मुलींचे व महिलांचे अपहरण या घृणास्पद वाढत्या घटनेने देश हादरला आहे.परंतु अत्याचाराच्या घटना थांबायला तयार नाही.महाराष्ट्रात दररोज २७ मुली ठरतात वासनेचा बळी,यावरून आपण समजू शकतो की देशात २८ राज्य आणि ८ केंद्रशाशित प्रदेश आहेत याही ठिकाणी असे अनेक घृणास्पद घटना मोठ्या प्रमाणात घडत असाव्यात यात तिळमात्र शंका नाही.देशातील वाढत्या अत्याचारामुळे व अपहरणाच्या घटनांमुळे समाजातील वातावरण भयभीत झाले असून सर्वसामान्यांनमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.तोच प्रकार भ्रष्टाचाराच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळतो.कारण देशातील वाढत्या भ्रष्टाचारामुळे देशात अनेक गंभीर समस्या निर्माण होऊन १४० कोटी जनतेचे वाटोळे होत आहे व आजच्या परिस्थितीत भारत भ्रष्टाचाराच्या बाबतीत जगात अव्वल स्थानावर आहे त्यामुळेच देशात महागाने उच्चांक गाठला आहे.देशातील भ्रष्टाचारी गोरगरीबांचे, शेतकऱ्यांचे, सर्वसामान्यांचे, मजुरांचे रक्त पिऊन आज गडगंज झाले आहेत व आपला संपूर्ण पैसा देश-विदेशात गुंतवून ठेवला आहे.आज मुठभर भ्रष्टाचाऱ्यांमुळे देशांचे संपूर्ण वाटोळे होत आहेत यात सर्वात जास्त राजकीय पुढारी दिसून येतात.असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) च्या २०२४ च्या अहवालानुसार,सध्याच्या लोकसभेत सुमारे ४४% (सुमारे २४० पेक्षा जास्त) खासदारांनी त्यांच्यावर गंभीर फौजदारी गुन्हे दाखल असल्याची माहिती स्वतःच्या शपथपत्रात दिली आहे. यातील अनेक गुन्हे हे भ्रष्टाचाराशी, आर्थिक गैरव्यवहारांशी आणि इतर गंभीर प्रकरणांशी संबंधित आहेत.यावरून स्पष्ट होते की, भ्रष्टाचाराचे व गुन्हेगारीचे सुत्रधार राजकीय पुढारीच आहेत.त्यामुळेच आज भ्रष्टाचाराची किड संपूर्ण क्षेत्रात लागलेली दिसून येते यामुळे सर्वसामान्यांचे जगणे अत्यंत अवघड व कठीण झाले आहे. आज देशातील वाढती महागाई, बेरोजगारी, महागडे शिक्षण, महागडी आरोग्य सुविधा, वाढते कुपोषण, भुकमरी या संपूर्ण घटना वाढत्या भ्रष्टाचारामुळे निर्माण झाल्या आहेत आणि याचे प्रायश्चित्त देशाची १४० कोटी जनता आजही भोगत आहे.आज आपण पहातो की, मुठभर भ्रष्टाचारी करोडोंचे भ्रष्टाचार करून आणि त्यांच्या कारणाम्याची हजारो कागदांची फाईल बनुनही निर्दोष सुटतात व हेच भ्रष्टाचारी आज आपल्याला सत्तेमध्ये दिसून येतात. भ्रष्टाचाऱ्यांवर भ्रष्टाचाराच्या अनेक केसेस दाखल असतांना सुध्दा त्यांना अचानक सरकारचा आश्रय मिळतो व सरकारकडून त्यांना क्लीन चिट दिली जाते आणि हेच भ्रष्टाचारी देशाच्या १४० कोटी जनतेला ग्यान पाजतांना दिसतात हे स्वतंत्र भारताचे दुर्भाग्य म्हणावे लागेल.आज देशात दररोज बलात्काराच्या, मुलींवरील अत्याचाराच्या व अपहरणाच्या महाभयानक घटना दररोज होतांना आपण पहातो.परंतु यांच्यावर कठोर कारवाईचे प्रावधान नसल्याने अनेक गुन्हेगार खुलेआम फिरताना दिसतात व कोर्टामध्ये तारीख पे तारीख असा लपंडाव दिसून येतो.आसाराम बापू ला एक अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या आरोपाखाली जोधपुर पुलिस ने ३१ऑगस्ट २०१३ ला इंदौर आश्रम मधुन कैद केले होते तेव्हा पासून तर आज पर्यंत जेलमध्येच आहे परंतु कठोर शिक्षा किंवा फाशीच्या शिक्षेचा काहीही अतापता नाही. त्याचप्रमाणे२०१७ चा उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी कुलदीप सेंगर याला अजून पर्यंत फाशीची शिक्षा किंवा कठोर शिक्षा ठोठावण्यात आली नाही हेही देशाचे दुर्भाग्य म्हणावे लागेल.असे अनेक मोठमोठे दिग्गज देशात आहे की त्यांनी घृणास्पद कृत्य केले आहे परंतु कारवाई मात्र शुन्य आहे.असे अनेक प्रकार देशात घडले आहे व घडत आहे परंतु पिडीतांना अजूनपर्यंत न्याय मिळालेला नाही.उन्नाव बलात्कार प्रकरण जर फास्ट ट्रॅक कोर्टच्या माध्यमातून चालविले असते तर आतापर्यंत कुलदीप सेंगर फासावर लटकला असता. राजकीय पुढाऱ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे की काही लोक सत्तेच्या पडद्याआड अनेक घृणास्पद कृत्य करीत असतात.तेच काम कुलदीप सेंगरने सत्तेमध्ये असतांना २०१७ मध्ये केले. अशाप्रकारे देशात अनेक अत्याचाराच्या घटना आहेत की राजकीय आश्रयामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच नाही आणि होणारही नाही.आतातर मुलींवरील व महिलांवरील अत्याचारांच्या बाबतीत भोंदूबाबांनी कळस गाठल्याचे दिसून येते दररोजच्या वृत्तपत्रात व मिडियाच्या माध्यमातून घृणास्पद प्रकरण उघडकीस येत आहे.त्यामुळे आता देशात वाढते अत्याचार पहाता; पोलिस विभागाला खुली सुट देऊन त्यांचा एन्काऊंटर किंवा फासावर लटकविने हाच पर्याय सरकारने स्वीकारला पाहिजे. आजही अनेक भोंदूबाबा व कूलदिप सेंगर सारखे अनेक राजकीय पुढारी राजकीय आश्रयाखाली जेलमध्ये शाही जिंदगी जगत आहे. परंतु त्यांना अजुनपर्यंत फाशीची शिक्षा किंवा कठोर शिक्षा ठोठावण्यात आली नाही हेही भारताचे दुर्भाग्य म्हणावे लागेल.या कारणांमुळेच देशात मुलींवरील व महिलांवरील अत्याचारामध्ये मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ झाल्याचे दिसून येते. बलात्कारी आणि भ्रष्टाचारी यांच्यात यत्किंचितही फरक नाही कारण बलात्कारी हा संपूर्ण समाजाला कलंकित करून १४० कोटी जनतेवर आघात करतो;तर भ्रष्टाचारी हा भ्रष्टाचाराच्या माध्यमातून करोडोंची संपत्ती देश-विदेशात जमा करून १४० कोटी जनतेचे कळतनकळत रक्त पित असतो व संपूर्ण समाज व्यवस्थेला आर्थिक नुकसान पोहचवुन पोखरत असतो.देशात शक्ती कायद्यात गुन्हेगाराला २१ दिवसांत फाशी देण्याची तरतूद आहे.मात्र दुर्दैवाने हा कायदा केंद्राकडे अंतिम मंजुरीसाठी प्रलंबित असल्याचे सांगितले जाते.आज शक्ती कायदा राज्यासह देशात लागू असता तर उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपीं कुलदीप सेंगर किंवा नसरापूरच्या नराधमाला किंवा अन्य बलात्काऱ्याला २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती आणि अशा गंभीर गुन्हेगारांवर कायद्याचा धाक बसला असता.परंतु देशाचे दुर्भाग्य म्हणावे लागेल की असा कायदा अमलात आणण्यासाठी राजकीय पुढारीच हिचकीचावतात. त्यामुळे आज बलात्कार प्रकरणातील भोंदूबाबा,कुलदिप सेंगर सारखे अनेक राजकीय पुढारी व बाहुबली हे राजकीय आश्रयाने जेलमध्ये शाही जिंदगी जगत आहे .यांना तर फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे होती परंतु हे देशाचे दुर्भाग्य म्हणावे लागेल.आज देशात वाढते अत्याचार व भ्रष्टाचार पहाता यांच्यासाठी फक्त फाशीच्याच शिक्षेचे प्रावधान असायला हवे.कारण या दोन्ही घटना समाजाला लागलेली किड आहे.यावर नियंत्रण तेंव्हाच संभव आहे की, अशा अट्टल गुन्हेगारांना फाशीची शिक्षा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत यात सुधारणा शक्य नाही.अट्टल गुन्हेगार,बलात्कारी,भ्रष्टाचारी, विविध गुन्हेगार अशा कैद्यांना सुधारण्याची संधी म्हणून कुटुंबातील व्यक्तीचे आजारपण,विवाह किंवा मृत्यू प्रसंगी पॅरोल किंवा फर्लो देण्याची तरतूद देशाच्या अनेक राज्यात आहे.परंतु देशातील अनेक राज्यांतील कैदी पॅरोल किंवा फर्लो वर असणारे अनेक कैदी अजुनही फरार असल्याचे सांगितले जाते.परंतु मी म्हणतो की, अशा अट्टल गुन्हेगारांना पॅरोल किंवा फर्लो का म्हणून द्यायचा? ज्यांना गुन्हा करतांना समाजाची किंवा देशाच्या जनतेचा आत्मा दुःखावण्याची थोडीशीही जाणीव नाही किंवा लाज वाटत नाही अशांना का म्हणून मोकळीक द्यायची!त्यामुळे वाढत्या भयावह घटना व मुलींवरील अत्याचार पहाता अट्टल गुन्हेगारांना सजा-ए-मौत हीच एकमेव सजा असायला हवी.देशात लैंगिक अत्याचार, बलात्कारी, अट्टल गुन्हेगार यापेक्षा सर्वात मोठे गुन्हे देशात घर करून बसले आहेत ते गुन्हेगार म्हणजे "भ्रष्टाचारी" आज देशाला व देशाच्या १४० कोटी जनतेला मुठभर भ्रष्टाचाऱ्यांनी पोखरून टाकले आहे. आज देशात भ्रष्टाचार येवढा उफाळलेला आहे की गरीब व सर्वसामान्यांचे रक्त पित आहे.त्यामुळे यांचा एन्काऊंटर होने किंवा फासावर लटकविले अत्यंत गरजेचे आहे यासाठी पोलीस विभागाला मोकळीक असने आवश्यक आहे.देशात भ्रष्टाचाराची जळे-मुळे सर्वात जास्त राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात दिसून येतात. त्यामुळे पोलिस विभागाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.त्यामुळे भ्रष्टाचाऱ्यांच्या केसालाही धक्का लागत नाही व कायद्याच्या चाकोरीतून तारीख पे तारीख असा लपंडाव सुरू रहाते व कालांतराने सुटका होते.यालाही आश्चर्यच म्हणावे लागेल. आज भ्रष्टाचारी करोडो,अरबो रूपये घेऊन देशांच्या बाहेर फरार होतात आणि झाले आहेत.परंतु आपण काहीच करू शकत नाही व हातावर हात ठेवून बसुन राहातो.ही सुद्धा आपली शोकांतिका म्हणावी लागेल. मी केंद्र सरकारला व देशातील संपूर्ण राज्य सरकारांना विनंती करतो की, लैंगिक अत्याचार, मुलींचे आणि महिलांचे अपहरण करणारी टोळी व भ्रष्टाचारी यावर आळा घालण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टच्या माध्यमातून किंवा शक्ती कायद्याच्या माध्यमातून गुन्हेगारांना फासावर लटकविले पाहिजे.जय हिंद.

रमेश कृष्णराव लांजेवार

 स्वतंत्र पत्रकार