““सिपेट” अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम मुदत 31 मे.

““सिपेट” अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन प्रवेश अर्ज  भरण्याची अंतिम मुदत 31 मे.

छत्रपती संभाजीनगर, दि. 27) : केंद्रीय पेट्रोरसायन अभियांत्रिकी व प्रौद्योगिकी संस्थान (CIPET), छत्रपती संभाजीनगर येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी विविध प्लास्टिक्स अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम मुदत 31 मे 2026 आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे निदेशक व प्रमुख ए. के. राव यांनी केले आहे.

दरवर्षी ऑल इंडिया स्तरावर घेतल्या जाणाऱ्या CIPET Admission Test (CAT) च्या माध्यमातून गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो. यावर्षी प्रवेश परीक्षा 7 जून 2026 रोजी होणार असून परीक्षेसाठी नोंदणी cipet26.onlineregistrationform.org⁠ येथे सुरू आहे.

सिपेट, छत्रपती संभाजीनगर येथे दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी डिप्लोमा इन प्लास्टिक टेक्नॉलॉजी (DPT) आणि डिप्लोमा इन प्लास्टिक मोल्ड टेक्नॉलॉजी (DPMT) हे तीन वर्षांचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. तसेच बी.एस्सी. उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन प्लास्टिक प्रोसेसिंग अँड टेस्टिंग (PGD-PPT) हा दोन वर्षांचा अभ्यासक्रम सुरू आहे. अभियांत्रिकी डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी पोस्ट डिप्लोमा इन प्लास्टिक मोल्ड डिझाइन (PD-PMD) हा 18 महिन्यांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे.

केंद्रीय पेट्रोरसायन अभियांत्रिकी व प्रौद्योगिकी संस्थान (CIPET) ही संस्था महाराष्ट्रातील प्लास्टिक्स उद्योगांना तांत्रिक सहाय्य, कुशल मनुष्यबळ निर्मिती तसेच संशोधन व विकासकार्याला चालना देण्याच्या उद्देशाने 2006 मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे स्थापन करण्यात आली. संस्थेला ISO 9001:2015 मानांकन प्राप्त असून येथे AICTE मान्यताप्राप्त व MSBTE समतुल्य प्लास्टिक्स अभियांत्रिकी अभ्यासक्रम राबविले जातात.

संस्थेत जागतिक दर्ज्याचे कॅड/कॅम, टूल रूम, प्लास्टिक प्रोसेसिंग आणि प्लास्टिक टेस्टिंग विभाग कार्यरत असून आधुनिक यंत्रसामग्रीच्या साहाय्याने उद्योगांना तांत्रिक सहाय्य तसेच विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक आधारित प्रशिक्षण दिले जाते. रोजगार व स्वयंरोजगार लक्षात घेऊन तयार करण्यात आलेल्या अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होत असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले.

अधिक माहितीसाठी 9373687915 किंवा 0240-2478322 या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 भरण्याची अंतिम मुदत 31 मे 2026 आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे निदेशक व प्रमुख ए. के. राव यांनी केले आहे.